US Open 2025 : ग्रॅनोलर्स-झेबालोस जोडीने पटकावले दुहेरीचे जेतेपद, व्हेंड्रोमे आणि इव्हानोव्ह ठरले ज्युनियर चॅम्पियन

US Open 2025 Final Updates : यूएस ओपन टेनिस स्पर्धेतील शनिवारचा दिवस रोमांच आणि उत्साहाने भरलेला ठरला. पुरुष युगल फायनलमध्ये स्पेनच्या मार्सेल ग्रॅनोलर्स आणि अर्जेंटिनाच्या होरासियो झेबायोस यांनी अप्रतिम पुनरागमन करत विजेतेपद पटकावले. पाचव्या मानांकित या जोडीने इंग्लंडच्या जो सॅलिसबरी आणि नील स्कूप्स्की यांचा 3-6, 7-6 (4), 7-5 असा पराभव करत यूएस ओपन पुरुष युगल अजिंक्यपद पटकावले.
या जोडीने पराभव एका गुणाने जवळ असतानाही संयम राखत विजय मिळवला. यापूर्वी त्यांनी फ्रेंच ओपनही जिंकले होते, हे त्यांचे यंदाचे दुसरे ग्रँड स्लॅम विजेतेपद आहे. प्रेस कॉन्फरन्समध्ये ग्रॅनोलर्स म्हणाला, “टेनिस कधीकधी वेडेपणासारखे असते. एका क्षणी तुम्ही हारण्याच्या उंबरठ्यावर असता आणि दुसऱ्या क्षणी ट्रॉफी तुमच्या हातात असते.”
¡Los triunfos siguen! 🏆 pic.twitter.com/Xu98zeJoHf
— US Open Tennis (@usopen) September 6, 2025
ज्युनियर गटातही पाहिला मिळाली चुरस –
The sister duo Alena and Jana are junior girls’ doubles champions! 🇨🇿 pic.twitter.com/1bOKcYFqPi
— US Open Tennis (@usopen) September 6, 2025
ज्युनियर गटातही खेळाडूंनी आपली छाप पाडली. मुलींच्या एकेरीत अमेरिकेच्या जेलिन व्हेंड्रोमने स्वीडनच्या क्वालिफायर ली निल्सनचा 7-6 (2), 6-2 असा पराभव करत विजेतेपद पटकावले. पहिल्या सेटमध्ये पिछाडीवर असतानाही तिने टाय-ब्रेकमध्ये बाजी मारली आणि दुसऱ्या सेटमध्ये सहज विजय मिळवला.
हेही वाचा – US Open 2025 : आर्यना सबालेंकावर पैशांचा पाऊस! सलग दुसऱ्यांदा यूएस ओपन ट्रॉफीवर नाव कोरत रचला इतिहास
मुलांच्या एकेरीत बल्गेरियाच्या विद्यमान विम्बल्डन विजेत्या इवान इव्हानोव्हने आपल्याच देशाच्या अलेक्झांडर व्हासिलिव्हला 7-5, 6-3 असे हरवत अजिंक्यपद मिळवले. मुलींच्या युगलमध्ये चेक प्रजासत्ताकच्या एलेना कोव्हाकोव्हा आणि जाना कोव्हाकोव्हा या बहिणींनी जेलिन व्हेंड्रोम आणि लायमा व्लॅडसन यांचा पराभव करत विजेतेपद मिळवले.
हेही वाचा – MS Dhoni : गोळ्यांच्या वर्षावासह एमएस धोनीचं चित्रपटात पदार्पण? ‘द चेज’चा रोमांचक टीझर रिलीज! पाहा VIDEO
मुलांच्या युगलमध्ये अमेरिकेच्या कीटन हॅन्स आणि जॅक केनेडी यांनी नोआ जॉन्स्टन आणि बेंजामिन विलवर्थ यांच्यावर मात करत ट्रॉफी उंचावली.यूएस ओपनमधील हे रोमांचक सामने टेनिसप्रेमींसाठी अविस्मरणीय ठरले.





