US Open 2024 : बोपण्णा-सुत्जियादी जोडीची मिश्र दुहेरीच्या Semi-final मध्ये धडक…

US Open 2024 Mixed Doubles (Rohan Bopanna-Aldila Sutjiadi) :- भारताचा 44 वर्षीय अनुभवी टेनिसपटू रोहन बोपण्णा आणि त्याची इंडोनेशियन जोडीदार 29 वर्षीय अल्दिला सुत्जियादी यांनी ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू एब्डेन आणि चेक प्रजासत्ताकच्या बार्बोरा क्रेज्सिकोवा यांना अटीतटीच्या लढतीत पराभूत करून यूएस ओपन टेनिस स्पर्धेच्या मिश्र दुहेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. 2 सप्टेंबर रोजी, त्यांनी कोर्ट 5 वर उपांत्यपूर्व फेरीत मॅथ्यू एब्डेन आणि बार्बोरा क्रेजिकोव्हा या जोडीचा 7-6 (7-4), 2-6, 10-7 असा पराभव केला. हा सामना जवळपास एक तास 33 मिनिटे चालला.
आता उपांत्य फेरीत (Semi-final) बोपण्णा आणि सुत्जियादी यांचा सामना डोनाल्ड यंग आणि टेलर टाऊनसेंड या अमेरिकन जोडीशी होईल. ज्यांनी उपांत्यपूर्व फेरीत हॅरी हेलिओवारा आणि ॲना डॅनिलिना या जोडीचा 6-7 (3-7), 6-3, 10-8 असा पराभव केला होता.
रोहन बोपण्णा आणि अल्दिला सुत्जियादी या जोडीचा उपांत्य फेरीचा (Semi-final) सामना लुईस आर्मस्ट्राँग स्टेडियमवर बुधवारी मध्यरात्री भारतीय वेळेनुसार 2.25 AM वाजता सुरू होईल. जर रोहन बोपण्णाने विजेतेपद पटकावले तर त्याला आणि त्याच्या जोडीदाराला 2 लाख अमेरिकन डॉलर्स (1 कोटी 67 लाख) बक्षीस रक्कम मिळेल.
Paris Paralympics 2024 : भारताचे सर्वात यशस्वी 24 तास, ऐतिहासिक कामगिरीसह एका दिवसात जिंकली 8 पदके…
याआधीच्या सामन्यात म्हणजेच दुसऱ्या फेरीत (Round of 16) बोपण्णा आणि सुत्जियादी यांनी ऑस्ट्रेलियाच्या जॉन पियर्स आणि चेक प्रजासत्ताकच्या कॅटरिना सिनियाकोव्हा यांचा 0-6, 7-6(5), 10-7 असा पराभव केला होता. तर पहिल्या फेरीत बोपन्ना-सुत्जियादी यांच्या जोडीने जर्मनीच्या टिम पुएत्झ आणि डच खेळाडू डेमी शुअर्सविरुद्ध 7-6(7) ,7-6(5) असा विजय साकारताना आगेकूच केली होती.





