US Open 2024 : कार्लोस अल्काराझ दुखापतग्रस्त, स्पर्धेतील सहभागाबद्दल साशंकता…

US Open 2024 : न्यूयॉर्क येथे उद्यापासून (सोमवार, 26 आॅगस्ट) सुरु होणाऱ्या युएस ओपन स्पर्धेच्या आधी टेनिसपटू कार्लोस अल्काराझ दुखापतग्रस्त झाला असल्याने स्पर्धेतील त्याच्या सहभागाबद्दल साशंकता निर्माण झाली आहे.
कार्लोस अल्काराझच्या उजव्या घोट्याला दुखापत झाली आहे. त्यामुळे त्याने सराव थांबविल्याचे दिसून आहे. असे असले तरी, याबाबत मी ठीक असून केवळ सावधगिरी म्हणून मी सराव थांबवत असल्याचे 21 वर्षांच्या कार्लोस अल्काराझने स्पष्ट केले आहे.
यापूर्वी कार्लोस अल्काराझने जून महिन्यात फ्रेंच ओपन व जुलै महिन्यात विम्बल्डन स्पर्धेचे विजतेपद मिळविले होते. यूएस ओपन स्पर्धेसाठी त्याने चांगली तयारी केली होती. मात्र झालेल्या दुखापतीने त्याला सराव करता आला नसल्याने तो नाराज असल्याचे दिसत आहे.
ENG vs SL 1st Test : जो रूटचे विक्रमी अर्धशतक, राहुल द्रविड आणि ॲलन बॉर्डरला टाकले मागे…
घोट्याला दुखापत होऊन देखील मला सराव थांबवायचा नव्हता. मी सराव केल्यानंतरच स्पर्धेत खेळण्यासाठी तयार होऊ शकेल व मला या स्पर्धेत खेळायचे असून मी उद्या किंवा आगामी दोन दिवसांत पूर्णपणे तंदुरुस्त होऊन कोर्टावर परतेल, असा आत्मविश्वास कार्लोस अल्काराझने व्यक्त केला. स्पर्धेत तिसरा मानांकित असलेला कार्लोस अल्काराझ मंगळवारी रात्री 188 व्या मानांकित असेल्या ऑस्ट्रेलियाच्या ली तू विरुद्ध पहिला सामना खेळणार आहे.





