Pimpari News : पीसीसीओई येथे सार्वत्रिक मानवी मूल्य विषयावर प्रशिक्षण संपन्न
पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (Pimpari News) येथे 'सार्वत्रिक मानवी मूल्ये' या विषयावर तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न झाली.

Pimpari News : पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (Pimpari News) येथे ‘सार्वत्रिक मानवी मूल्ये’ या विषयावर तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न झाली. एआयसीटीईच्या मान्यतेने व्यवस्थापन विकास प्रशिक्षण कार्यक्रम अंतर्गत ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
या प्रशिक्षणात पीसीईटी संस्था आणि ११० महाविद्यालयांमधील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी व प्रतिनिधींनी (Pimpari News) नोंदणी केली होती. पीसीसीओई यूएचव्ही नोडल केंद्र प्रमुख पीसीसीओईचे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी, शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. राजेश्वरी कन्नन आणि एसपीपीयूचे शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. प्रमोद पाटील, पीसीसीओईचे सर्व विभागप्रमुख, अधिष्ठाता, सहयोगी अधिष्ठाता आदी उपस्थित होते.
या प्रशिक्षणामध्ये आत्म-शोध, नातेसंबंधांमधील सुसंवाद, नैतिक आचरण आणि संस्थात्मक पद्धतींमध्ये वैश्विक मानवी मूल्यांचे एकत्रीकरण या विषयावर उपस्थित सहभागींनी मत व्यक्त केले. तिसऱ्या दिवशी पॅनल चर्चा झाली. या पॅनेल मध्ये पीसीसीओईचे उप संचालक डॉ. नीळकंठ चोपडे, डॉ. राजेश्वरी कन्नन, डॉ. शीतल भंडारी, डॉ. लीना शर्मा, डॉ. संदीप पाटील आणि डॉ. राजेश फुरसुळे यांचा समावेश होता.
ज्यांनी अभ्यासक्रम एकीकरण, प्राध्यापक प्रशिक्षण आणि मूल्य आधारित संस्थात्मक परिसंस्था मजबूत करण्यावर चर्चा केली. डॉ. उमेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली व डॉ. अनिता माने, डॉ. विनय चिद्री यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या सत्रात किरण नाफडे यांनी निरीक्षक म्हणून काम पाहिले. याचे डॉ. महेश कोल्टे यांनी आयोजन केले होते.समन्वयक म्हणून डॉ. संदीप पाटील आणि मंजुषा देवकुळे यांनी काम केले.
समारोप सत्रात पीसीसीओईच्या (Pimpari News) विद्यार्थ्यांनी विकसित केलेल्या वैश्विक मानवी मूल्यांवरील वेबसाइटचे उद्घाटन करण्यात आले. वैश्विक मानवी मूल्यांमधील १४-क्रेडिटच्या बहुविद्याशाखीय उपक्रमांवर चर्चा करण्यात आली.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.





