US Open 2023 : इगा स्वेटेकचा धक्कादायक पराभव

न्युयॉर्क : पोलंडची स्टार महिला टेनिसपटू व गेल्या दोन मोसमांपासून ग्रॅंडस्लॅम स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केलेल्या इगा स्वेटेकला अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीत धक्कादायक पराभवाचा सामना करावा लागला. तीच्या मानाने अनुभव कमी असलेल्या लॅटिव्हियाच्या जेलेना ओस्तापेंकोने स्वेटेकचा 3-6, 6-3, 6-1 असा पराभव केला.
महिला एकेरीच्या अन्य लढतीत यजमान अमेरिकेच्या कोको गॉफने आगेकूच कायम राखताना डेन्मार्कच्या कॅरोलिन ओझीयांकीवर 6-3, 3-6, 6-1 असा विजय मिळवला. ट्युनिशियाच्या ओन्स जेबुरने चेक प्रजासत्ताकच्या मारिया बुझकोव्हावर 5-7, 7-6, 6-3 अशी मात केली.
पुरुष एकेरीत सर्बियाचा जागतिक अग्रमानांकित नोवाक जोकोवीचने अपलातून खेळ करताना उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले. त्याने चौथ्या फेरीच्या लढतीत क्रोएशियाचा बोर्ना गोजोवर 6-2, 7-5, 6-4 अशी सरळ तीन सेटमध्ये मात केली.
अन्य लढतीत रशियाच्या डॅनियल मेदवेदेवने अर्जेन्टिनाच्या सॅबेस्टीन बेझचा 6-2, 6-2, 7-6 असा पराभव केला. जर्मनीच्या अलेक्झांडर ज्वेरेव्हने बल्गेरीयाच्या ग्रीगोर दीमीत्रोव्हवर 6-7, 7-6, 6-1, 6-1 अशी मात केली.





