US Lung Pneumonia : आधी चीनमध्ये आता अमेरिकेतही गूढ न्यूमोनियाचा कहर ; लहान मुलांनी भरली रुग्णालये

US Lung Pneumonia : चीनमध्येही गूढ असणाऱ्या निमोनियाचा आजार शिगेला पोहोचला आहे. या आजारामुळे चीनमधील मुलांना मोठ्या प्रमाणात रुग्नालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, अमेरिकेतील ओहायोमध्ये मोठ्या संख्येने मुलांना गूढ न्यूमोनियाने ग्रासले आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. ओहायो हे एकमेव अमेरिकेचे राज्य आहे जेथे चीनसारखा गूढ न्यूमोनिया रोग पसरला आहे.
वॉरन काउंटीच्या आरोग्य अधिकार्यांच्या म्हणण्यानुसार, ऑगस्टपासून व्हाईट लंग सिंड्रोम नावाची 142 बाल वैद्यकीय प्रकरणे आढळून आली आहेत. वॉरेन काउंटीच्या अधिकाऱ्याने एका निवेदनात सांगितले की, व्हाईट लंग सिंड्रोम हे ओहायो वैद्यकीय विभागासाठी एक आव्हान बनले आहे. ते म्हणाले की हा रोग चीनमध्ये पसरलेल्या रोगासारखाच आहे. अनेक युरोपीय देशांना याबाबतीत अशाच अडचणी येत आहेत.
यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) च्या एका सूत्राने सांगितले, राष्ट्रीय स्तरावर सर्व काही सामान्य आहे. असे असूनही, ओहायोचे अधिकारी आजारपणाची लाट कशामुळे उद्भवत आहेत याचा तपास करत आहेत.
दरम्यान, सरासरी 8 रुग्ण, ज्यापैकी काही 3 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत, त्यांना मायकोप्लाझ्मा न्यूमोनिया आहे. या आजारात हानिकारक विषाणूंमुळे फुफ्फुसाचा संसर्ग होतो. जिवाणूजन्य श्वसन आजाराचे प्रमाण दर काही वर्षांनी वाढते, सामान्यतः जेव्हा लोक फ्लू किंवा इतर विषाणूजन्य आजारांपासून बरे होत असतात.





