US-Iran Tension: जागतिक स्तरावर सध्या दोन बड्या देशांच्या नेत्यांच्या भेटीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. अमेरिका आणि चीन यांच्यात व्दिपक्षीय भेट झाली. यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी चीन दौऱ्यादरम्यान इराणबाबत कठोर भूमिका घेतली आणि तेहरानने एकतर तडजोड करावी किंवा विनाशाला सामोरे जावे लागेल, असा स्पष्ट इशारा दिला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनच्या दौऱ्यावरून निघताना, “इराण ‘उद्ध्वस्त’ झाला आहे आणिम्हणून संघर्ष संपवण्यासाठी त्यांनी एकतर तडजोड केली पाहिजे किंवा त्यांना विनाशाला सामोरे जावे लागेल’ असा स्पष्ट इशारा दिला आहे. (US-Iran Tension) चीनच्या तीन दिवसीय दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी त्यांनी एका वरृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांनी,”इराणसमोर तडजोड किंवा विनाश हा पर्याय आहे.” त्यांनी यावर जोर दिला की अमेरिका ‘इराणला अण्वस्त्रे मिळवू देणार नाही’. इराणसह विविध मुद्द्यांवर चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी सविस्तर चर्चा केल्यानंतर ट्रम्प म्हणाले, “ते आता संपले आहेत. ते तडजोड करू शकतात किंवा त्यांचा पूर्णपणे विनाश होईल.”असे म्हटले आहे. मुलाखतीदरम्यान ट्रम्प म्हणाले, “अध्यक्ष शी यांना अमेरिका आणि इराण यांच्यात तडजोड झालेली पाहायची आहे.” त्यांनी सांगितले की शी यांनी मदतीचा हात पुढे करत म्हटले, “मी कोणत्याही प्रकारे मदत करू शकत असेन, तर मी करेन.”असे त्यांनी यावेळी म्हटले. ट्रम्प यांनी पुढे सांगितले की, “इराणकडे अण्वस्त्रे असावीत असे चीनलाही वाटत नाही”. ट्रम्प यांनी असेही सांगितले की जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफचे अध्यक्ष, जनरल डॅन केन यांनी त्यांना सांगितले की अमेरिका इराणचे खर्ग बेट केवळ ‘चार ते पाच मिनिटांत’ पूर्णपणे नष्ट करू शकते.” US-Iran Tension: चीन इराणला लष्करी मदत देणार नाही ; ट्रम्प यांचा दावा (US-Iran Tension) इराणला चीनच्या पाठिंब्याबाबत, ट्रम्प म्हणाले की त्यांनी शी जिनपिंग यांच्याशी या विषयावर चर्चा केली, ज्यांनी त्यांना आश्वासन दिले की चीन “इराणला लष्करी उपकरणे पुरवणार नाही.” सध्या, चीन इराणचे ९० टक्के तेल खरेदी करतो आणि तेहरानसोबत त्याची सामरिक व लष्करी भागीदारी आहे. ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांचे वर्णन “मैत्रीपूर्ण व्यक्ती” आणि “आपल्या कामावर लक्ष केंद्रित करणारे” असे केले. त्यांच्या सन्मानार्थ आयोजित लष्करी सन्मान सोहळ्याचे वर्णन त्यांनी “अद्भुत” असे केले आणि म्हणाले, “तुम्ही हॉलिवूडमध्ये गेलात तरी तुम्हाला असे काही सापडणार नाही.” ते म्हणाले की चीनसोबतचे त्यांचे संबंध अत्यंत यशस्वी ठरले आहेत. ते म्हणाले, “चीनसोबत आमचे संबंध खूप चांगले आहेत. शी एक विलक्षण नेते आहेत. ते बऱ्याच काळापासून सत्तेत आहेत, ते खूप शक्तिशाली आणि सामर्थ्यवान आहेत. यात काही शंका नाही.” आमचे संबंध चांगले आहेत.” इराणच्या लष्करी क्षमतेवर मोठा दावा केला इराणविरुद्धच्या लष्करी कारवाईचे समर्थन करताना ट्रम्प म्हणाले की, व्हिएतनाम आणि इराकसारख्या पूर्वीच्या अमेरिकी युद्धांच्या तुलनेत ही एक खूपच लहान मोहीम होती. त्यांनी दावा केला की इराणचे नौदल जवळजवळ नष्ट झाले आहे आणि त्यांच्याकडे आता प्रभावी हवाई दल किंवा हवाई संरक्षण क्षमता राहिलेली नाही. ट्रम्प म्हणाले, “त्यांनी थोडी क्षमता मिळवली आहे. आम्ही त्यांना एका दिवसात नष्ट करू.” ट्रम्प यांच्यासोबत टेस्लाचे प्रमुख इलॉन मस्क आणि ॲपलचे प्रमुख टिम कुक यांच्यासह प्रमुख अमेरिकन कंपन्यांचे वरिष्ठ सीईओ उपस्थित होते. ते म्हणाले की या व्यावसायिक नेत्यांनी उत्तम काम केले आहे. ट्रम्प म्हणाले की त्यांनी शी जिनपिंग यांना अमेरिकेकडून तेल खरेदी करण्यास प्रोत्साहित केले, ज्यावर शी यांनी उत्तर दिले, “त्यांना ही कल्पना आवडली आहे.” ते म्हणाले, “ते टेक्सासला जातील. आम्ही टेक्सास, लुइझियाना आणि अलास्का येथे चिनी जहाजे पाठवण्यास सुरुवात करू. मला विश्वास आहे की आम्ही त्यावर एका करारावर पोहोचलो आहोत.” ही एक मोठी गोष्ट आहे.” चीन २०० बोईंग विमाने खरेदी करणार (US-Iran Tension) चीनने आपली बाजारपेठ खुली करावी अशी इच्छा ट्रम्प यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, “जर चीनने आपली बाजारपेठ खुली केली, तर आमच्या कंपन्यांसाठी ही एक अविश्वसनीय संधी असेल आणि मला वाटते की हे चीनसाठीही चांगले ठरेल.” अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी असाही दावा केला की शी जिनपिंग यांनी २०० बोईंग विमाने खरेदी करण्यास सहमती दर्शवली आहे. ट्रम्प म्हणाले, “मोठी विमाने. ही एक मोठी गोष्ट आहे.” याव्यतिरिक्त, त्यांनी चीनला व्यापारासाठी व्हिसा वापरण्याचे आवाहन केले आणि सांगितले की चीन मोठ्या प्रमाणात अमेरिकन कृषी उत्पादने खरेदी करेल, ज्याचे त्यांनी “उत्कृष्ट” असे वर्णन केले.