अमेरिकेतील गॅस कंपनी भारतात गुंतवणूक करणार
Updated On:

नवी दिल्ली : अमेरिकेतील गॅस क्षेत्रातील मोठी कंपनी ऐअर प्रॉडक्ट अँड केमिकल्स भारतात पुढील पाच वर्षात पाच ते दहा अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार आहे. ही कंपनी भारतातील कोल इंडिया आणि इतर कोळसा कंपन्याबरोबर सहकार्य करार करून कोळसा आधारित औद्योगिक गॅस निर्मिती क्षेत्रात अनेक प्रकल्प उभारणार आहे.
या कंपनीच्या जगभरात 750 शाखा आहेत. पन्नास देशात ही कंपनी कार्यरत आहे. भारतात उद्योगांना लागणाऱ्या विविध वायूची गरज वाढणार आहे. त्या दृष्टिकोनातून आम्ही भारतामध्ये प्रकल्प उभारण्यासाठी पुढाकार घेतला असल्याचे या कंपनीचे उपाध्यक्ष रिचर्ड बुकॉक यांनी सांगितले.





