Uruguay Flight Cancelled : फिफा विश्वचषकातून बाहेर पडताच उरुग्वेच्या संघाला मोठा झटका! संतापलेल्या बोर्डाने ‘चार्टर फ्लाईट’ केली रद्द
Uruguay Flight Cancelled : असोसिएशनने एक कडक आणि मोठा निर्णय घेत खेळाडू तसेच कोचिंग स्टाफसाठी बुक केलेली हक्काची 'खास चार्टर फ्लाईट' थेट रद्द केली आहे.

Uruguay Out Of FIFA WC 2026 Charter Flight Cancelled Marcelo Bielsa : फिफा फुटबॉल विश्वचषक २०२६ स्पर्धेतून ग्रुप स्टेजमध्येच धक्कादायकरीत्या बाहेर पडण्याचा मोठा फटका उरुग्वेच्या संघाला बसला आहे. स्पर्धेतील अत्यंत निराशाजनक कामगिरीवर उरुग्वे फुटबॉल असोसिएशनने (AUF) तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. असोसिएशनने एक कडक आणि मोठा निर्णय घेत खेळाडू तसेच कोचिंग स्टाफसाठी बुक केलेली हक्काची ‘खास चार्टर फ्लाईट’ थेट रद्द केली आहे.
आता तुकड्या-तुकड्यांनी आणि कमर्शियल विमानाने प्रवास –
उरुग्वेचे विश्वचषकातील आव्हान अपेक्षेपेक्षा खूप आधी संपल्यामुळे फुटबॉल फेडरेशनने हा अपमानकारक निर्णय घेतल्याचे मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे. सामान्यतः कोणताही मोठा आंतरराष्ट्रीय दौरा किंवा स्पर्धा संपल्यानंतर राष्ट्रीय संघ फेडरेशनने बुक केलेल्या चार्टर विमानाने एकत्र मायदेशी परततात. मात्र, उरुग्वे फुटबॉल असोसिएशनने मेक्सिकोमधील आपल्या बेस कॅम्पवरून राजधानी मोंटेव्हिडियोसाठी शेड्यूल केलेली ग्रुप फ्लाईटच रद्द केली आहे.
या निर्णयामुळे आता संपूर्ण संघ एकत्र मायदेशी परतू शकणार नाही. सर्व खेळाडूंना आणि स्टाफ सदस्यांना आता सामान्य प्रवाशांप्रमाणे कमर्शियल विमानाचे तिकीट काढून वैयक्तिकरीत्या प्रवास करावा लागणार आहे. यातील काही खेळाडू सुट्टी घालवण्यासाठी थेट मोंटेव्हिडियोला जातील, तर काही स्टार खेळाडू थेट युरोप आणि इतर देशांमधील आपापल्या क्लबमध्ये खेळण्यासाठी रवाना होणार आहेत.
🚨BREAKING: The Uruguay Football Association CANCELED the squad’s private plane! ✈️❌
Every player will return home on a commercial flight following their exit from the World Cup. pic.twitter.com/l4FrmVkvGm
— Polymarket Sports (@PolymarketSport) June 27, 2026
स्पेन आणि केप व्हर्डेने उडवला धुव्वा; मार्सेलो बिएलसा अपयशी –
Following their elimination from the 2026 FIFA World Cup, the Uruguayan Football Association (AUF) reportedly canceled the charter flight previously organized to transport the national team back to Montevideo. pic.twitter.com/GjFTPGvoVA
— 𝐀𝐬𝐢𝐟 🇮🇳 (@_asif) June 28, 2026
मुख्य प्रशिक्षक मार्सेलो बिएलसा यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या दोन वेळच्या माजी विश्वविजेत्या उरुग्वेला स्पेन, केप व्हर्डे आणि सौदी अरेबियासोबत ग्रुप ‘एच’ मध्ये ठेवण्यात आले होते. कागदावर स्पेन आणि उरुग्वे नॉकआऊटसाठी प्रबळ दावेदार होते.परंतु, उरुग्वेला पहिल्या सामन्यात सौदी अरेबियाने आणि दुसऱ्या सामन्यात अवघ्या ५ लाख लोकसंख्येच्या केप व्हर्डेने ड्रॉवर रोखले.
बाद फेरीत (Round of 32) पोहोचण्यासाठी उरुग्वेला स्पेनविरुद्धचा अखेरचा सामना जिंकणे अनिवार्य होते. मात्र, स्पेनने उरुग्वेचा १-० असा पराभव करत त्यांना स्पर्धेतून थेट बाहेरचा रस्ता दाखवला. उरुग्वेचा संघ ३ सामन्यांत केवळ २ गुण मिळवू शकला आणि तिसऱ्या स्थानावरील ‘बेस्ट ८’ संघांच्या रेसधूनही बाहेर पडला.





