FIFA WC 2026 : १६ सामने अन् १६ संघांचे पॅकअप! सोमवारपासून सुरू होणार ‘राउंड ऑफ ३२’ चा थरार; मेस्सी-रोनाल्डोचे सामने कधी?
FIFA WC 2026 : आता खऱ्या अर्थाने बाद फेरीची म्हणजेच 'राउंड ऑफ ३२' ची रणधुमाळी सुरू होणार आहे.

FIFA WC 2026 Round of 32 Schedule Qualified Teams Groups : फिफा फुटबॉल विश्वचषक २०२६ चा ग्रुप स्टेजचा टप्पा अखेर संपला असून, आता खऱ्या अर्थाने बाद फेरीची म्हणजेच ‘राउंड ऑफ ३२’ ची रणधुमाळी सुरू होणार आहे. या बाद फेरीचे संपूर्ण चित्र स्पष्ट झाले असून स्पर्धेचा रोमांच आता शिगेला पोहोचणार आहे. नॉकआऊटच्या या टप्प्यात आता एकाही चुकीला माफी नसेल; कारण येथे झालेली एक चूक कोणत्याही बलाढ्य संघाचे विश्वविजेतेपदाचे स्वप्न चक्काचूर करू शकते. या फेरीत एकूण १६ बाद फेरीचे सामने खेळवले जातील, ज्यामधून विजेते संघ पुढील फेरीसाठी पात्र ठरतील, तर पराभूत १६ संघांचे आव्हान संपुष्टात येईल.
‘या’ ३ संघांचा राहिला दबदबा; उरुग्वेचा पत्ता कट –
ग्रुप स्टेजमध्ये फ्रान्स, विद्यमान विश्वविजेता अर्जेंटिना आणि यजमान मेक्सिको या तिन्ही हेवीवेट संघांनी आपले सर्व सामने जिंकून ‘परफेक्ट रेकॉर्ड’सह बाद फेरीत प्रवेश केला आहे. दुसरीकडे, ग्रुप ‘एच’ मध्ये सर्वात मोठा उलटफेर पाहायला मिळाला, जिथे माजी विश्वविजेत्या उरुग्वेला बाहेरचा रस्ता धरावा लागला. या ग्रुपमधून स्पेनसोबतच, अवघ्या ५ लाख लोकसंख्येच्या केप व्हर्डे या देशाने इतिहास रचत बाद फेरी गाठली आहे.
पात्र ठरलेले संघ (Groups Wise):
- ग्रुप A: मेक्सिको, दक्षिण आफ्रिका
- ग्रुप B: स्वित्झर्लंड, कॅनडा, बोस्निया
- ग्रुप C: ब्राझील, मोरोक्को
- ग्रुप D: यूएसए, ऑस्ट्रेलिया, पराग्वे
- ग्रुप E: जर्मनी, आयव्हरी कोस्ट, इक्वाडोर
- ग्रुप F: नेदरलँड्स, जपान, स्वीडन
- ग्रुप G: बेल्जियम, इजिप्त
- ग्रुप H: स्पेन, केप व्हर्डे
- ग्रुप I: फ्रान्स, नॉर्वे, सेनेगल
- ग्रुप J: अर्जेंटिना, ऑस्ट्रिया, अल्जीरिया
- ग्रुप K: कोलंबिया, पोर्तुगाल, डीआर काँगो
- ग्रुप L: इंग्लंड, घाना, क्रोएशिया
‘राउंड ऑफ ३२’ चे संपूर्ण वेळापत्रक (भारतीय वेळेनुसार):
The Round of 32 is set. 🔐#FIFAWorldCup pic.twitter.com/viM72iNjw3
— FIFA World Cup (@FIFAWorldCup) June 28, 2026
- २९ जून (सोमवार): दक्षिण आफ्रिका विरुद्ध कॅनडा (रात्री १२:३० वा.), ब्राझील विरुद्ध जपान (रात्री १०:३० वा.)
- ३० जून (मंगळवार): जर्मनी विरुद्ध पराग्वे (पहाटे २:०० वा.), नेदरलँड्स विरुद्ध मोरोक्को (सकाळी ६:३० वा.), आयव्हरी कोस्ट विरुद्ध नॉर्वे (रात्री १०:३० वा.)
- १ जुलै (बुधवार): फ्रान्स विरुद्ध स्वीडन (पहाटे २:३० वा.), मेक्सिको विरुद्ध इक्वाडोर (सकाळी ६:३० वा.), इंग्लंड विरुद्ध डीआर काँगो (रात्री ९:३० वा.)
- २ जुलै (गुरुवार): बेल्जियम विरुद्ध सेनेगल (पहाटे १:३० वा.), यूएसए विरुद्ध बोस्निया (सकाळी ५:३० वा.)
- ३ जुलै (शुक्रवार): स्पेन विरुद्ध ऑस्ट्रिया (रात्री १२:३० वा.), पोर्तुगाल विरुद्ध क्रोएशिया (पहाटे ४:३० वा.), स्वित्झर्लंड विरुद्ध अल्जीरिया (सकाळी ८:३० वा.), ऑस्ट्रेलिया विरुद्ध इजिप्त (सकाळी ११:३० वा.)
- ४ जुलै (शनिवार): अर्जेंटिना विरुद्ध केप व्हर्डे (पहाटे ३:३० वा.), कोलंबिया विरुद्ध घाना (सकाळी ७:०० वा.)





