मुंबई : बॉलिवूडची रंगीला गर्ल म्हणजेच अभिनेत्री उर्मिला मातोंडकर ही उर्मिलाने तिच्या मेहनतीच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वत:चे असे वेगळे स्थान निर्माण केले आहे. २०१६ मध्ये तिने मॉडेल मोहसिन अख्तरशी लग्न करत चाहत्यांना सुखद धक्काच दिला. त्यानंतर आता उर्मिला आई कधी होणार? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. हाच प्रश्न तिला एका मुलाखतीमध्ये उर्मिलाने यावर वक्तव्य देखील केले आहे. मात्र तिचे उत्तर जरा गोंधळात टाकणारे असल्याचे म्हटले जात आहे.
उर्मिलाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये खासगी आयुष्याच्या अनेक गोष्टीवर भाष्य केले आहे. मुलाखतीदरम्यान, तिला आई होण्याचा विचार करत आहे का? किंवा एखाद्या बाळाला दत्तक घेणार आहेस का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उर्मिलाने दिलेल्या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
आई होण्याच्या गोष्टीचा फार कधी विचार केला नाही. हो आणि नाही पण. जेव्हा या गोष्टी व्हायच्या असतील तेव्हा त्या होतातच असे उर्मिला म्हणाली. पुढे ती म्हणाली, प्रत्येक स्त्रीने आई व्हावे असे काही नसते. ते योग्यवेळी आयुष्यात येतच. मला लहान मुले प्रचंड आवडतात. जगात अशी अनेक मुलं आहेत ज्यांना मायेची, प्रेमाची गरज आहे. मी बाळाला जन्म देतेय की नाही हे महत्त्वाचे नाहीये असे उर्मिला पुढे म्हणाली. उर्मिला मातोंडकरने बॉलिवूडकडे पाठ फिरवत राजकारणात प्रवेश घेतला आहे.