उर्मिलाने पुन्हा एकदा ‘रंगीला रे’वर धरला ठेका; खास कारणासाठी शेअर केला व्हिडिओ

Urmila Matondkar viral Video | अभिनेत्री उर्मिला मातोडकरला १९९५ मध्ये प्रदर्शित झालेल्या राम गोपाल वर्मा यांच्या ‘रंगीला’ या चित्रपटामुळे मोठी प्रसिध्दी मिळाली. ‘रंगीला रे’ या गाण्यातील तिचा लुक आणि डान्स आजही अनेकांच्या पसंतीस पडतो. नुकतेच या चित्रपटाला 30 वर्ष पूर्ण झाली आहेत. यानिमित्त तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. विशेष म्हणजे तिने या आयकॉनिक गाण्यावर पुन्हा एकदा डान्स केला आहे.
उर्मिलाने इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. निळ्या-पांढऱ्या रंगाच्या सुंदर ड्रेसमध्ये, हाय हील्स घालून तिने ‘रंगीला रे’मधील लोकप्रिय स्टेप पुन्हा एकदा सादर केली. गाण्याच्या सुरांवर तिच्या स्टेप्स आणि चेहऱ्यावरील आनंदी झलक पाहून चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला.
View this post on Instagram
डान्सचा व्हिडिओ शेअर करत उर्मिलाने कॅप्शनमध्ये लिहिले की, ” रंगीला हा फक्त चित्रपट नव्हे, तर एक भावना असल्याचं नमूद केलं.तीव्र आनंद, आशा, स्वप्ने, महत्त्वाकांक्षा, सौंदर्य, उत्साह, आपुलकी, कौतुक, प्रेम आणि इच्छा, संघर्ष आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जीवनाचा एक भव्य उत्सव! या चित्रपटातील प्रत्येक गाणे केवळ संगीत नाही तर नवरासाचा उत्सव आहे. श्रृंगार (प्रेम), हास्य (हशा), करुण (दु:ख), रौद्र (राग), वीर (धैर्य), भयानक (भय), बिभत्स (तिरस्कार), अद्भूत (आश्चर्य) आणि शांत (शांती). Urmila Matondkar viral Video |
एक निष्पाप मुलगी रुपेरी पडद्यावर येते आणि प्रेक्षकांचे मन जिंकते. प्रेक्षकांना सौंदर्य, कविता, जीवन आणि प्रेमाच्या कालातीत प्रवासावर घेऊन जाते. रंगीलाला आजपासून तीस वर्ष पूर्ण झाली! तुमचे प्रेम माझ्या प्रवासाचे सर्वात मोठे आशीर्वाद राहिले आहे. हो जा रंगीला रे…” असे उर्मिलाने कॅप्शनमध्ये लिहिले आहे.
उर्मिलाचा हा व्हिडिओ व्हायरल होताच चाहत्यांनी आणि सेलिब्रिटींनी तिला चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच वयाच्या ५१ व्या वर्षीही तिचे डान्स मूव्ह आणि फिटनेस पाहून चाहते तिचे कौतुक करत आहेत. Urmila Matondkar viral Video |
हेही वाचा :
सणासुदीच्या आधी सोन्याच्या किंमतीत भरघोस वाढ ; चांदीलाही आली चकाकी, वाचा आजचा भाव काय ?





