Urfi Javed: उर्फी जावेदला पुन्हा दुखापत; चेहऱ्यानंतर हातावर लालसर चटका

Urfi Javed: हटके आणि बोल्ड फॅशनमुळे कायम चर्चेत राहणारी उर्फी जावेद पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मात्र, यावेळी कारण तिचा ड्रेस नाही, तर तिच्या हाताला झालेली दुखापत आहे. काही दिवसांपूर्वी मांजरीने बोचकारल्याने तिच्या चेहऱ्यावर जखम झाली होती. आता पुन्हा एकदा उर्फीच्या हातावर लालसर डाग दिसल्याने तिचे चाहते काळजीत पडले आहेत.
हातावर भाजल्याच्या खुणा
एका पापाराझी व्हिडिओमध्ये उर्फी काळ्या रंगाच्या हटके ड्रेसमध्ये दिसली. ती गाडीतून उतरून कॅमेर्यांसाठी हसत पोझ देत असताना, तिच्या हातावर लालसर डाग स्पष्ट दिसला. हा डाग जणू काहीतरी भाजल्यासारखा वाटत होता. व्हिडिओ पाहताच अनेक चाहत्यांनी कमेंट्समध्ये उर्फीच्या तब्येतीबद्दल चिंता व्यक्त केली.
चाहत्यांची चिंता, काहींनी ट्रोलिंग
सोशल मीडियावर उर्फीचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. काहींनी “गेट वेल सून” म्हणत तिच्या तब्येतीसाठी शुभेच्छा दिल्या, तर काहींनी तिच्या ड्रेसवरून पुन्हा एकदा ट्रोलिंग केले. एका युजरने लिहिले, “हा ड्रेस आहे का की अपूर्ण साडी?” तर दुसऱ्याने विचारले, “नेहमी असं का घडतं तिच्यासोबत?”
रिअॅलिटी शोमधून प्रसिद्धी
उर्फी जावेदने गेल्या काही वर्षांत अनेक रिअॅलिटी शोमधून लोकप्रियता मिळवली आहे. नुकतेच तिने ‘द ट्रेटर्स’ हा शो जिंकून चर्चेत आली होती. यापूर्वी ती ‘एंगेज्ड रोका या धोखा’ हा शो होस्ट करताना दिसली होती. तिच्या आयुष्यावर आधारित ‘फॉलो कर लो यार’ हा शो देखील चर्चेत राहिला होता.
सध्या तिच्या जखमेने चाहते मात्र विचार करू लागले आहेत की उर्फीच्या या दुखापतींमागे नेमकं काय कारण काय असेल.





