“सोशल मीडियापासून अलिप्त राहावं लागलंं”; उर्फी जावेदची पोस्ट चर्चेत, कान्सला जाण्यासाठी केली तयारी पण ऐनवेळी…

Urfi Javed Cannes : १३ मे २०२५ पासून दि कान्स चित्रपट महोत्सवाला सुरूवात झाली आहे. यंदाही या महोत्सवाचे आयोजन मोठ्या दिमाखदार पद्धतीने केले असून हॅालीवूडसह बॅालीवूड कलाकारही या महोत्सवाला हजेरी लावत आहेत. नुकताच सोशल मीडियावर कान्सच्या रेड कार्पेटवरून अभिनेत्री उर्वशी रौतेलाचा फोटो व्हायरल झाला आहे.
तिने परिधान केलेल्या आउटफिटीची चर्चा सोशल मीडियावर होत असताना मॅाडेल उर्फी जावेदला हिला देखील कान्सला जायचं होतं पण तिचा व्हिसा रद्द झाल्याने तिला जात आलं नाही. याविषयी तिने सोशल मीडिया इन्स्टाग्रावर पोस्ट लिहित कान्सला जात आलं नसल्याची खंत व्यक्त केली आहे.
उर्फी जावेदने इंस्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टद्वारे तिने सांगितले की ती अलीकडच्या काळात कठीण काळातून जात होती. ती बऱ्याच काळापासून सोशल मीडियावर सक्रिय नव्हती, कारण तिच्यासोबत काही गोष्टी व्यवस्थित घडलेल्या नाहीत. तिला वारंवर इंडस्ट्रीत नकाराचा सामाना कारावा लागत होता. यामुळे तिने सोशल मीडियापासून अलिप्त राहणे पसंत केले असल्याचा खुलासा तिने स्वःत या पोस्टमधून केला आहे.
उर्फी जावेदने लिहिले, “मी गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियापासून दूर होते. मी काहीही अपलोड करत नव्हते. मी कुठेही दिसत नव्हते, कारण मी कठीण काळातून जात होते. माझा व्यवसाय चालत नव्हता. मी खूप वेगवेगळ्या गोष्टी करून पाहिल्या, पण प्रत्येक वेळी मला नकाराचा सामना करावा लागला. मला इंडे वाइल्ड मार्गे कान्सला जाण्याची संधी मिळाली, पण दुर्दैवाने… माझा व्हिसा नाकारला गेला. मी आउटफिटवर काम करत होते, पण माझा व्हिसा नाकारल्यानंतर मी आणि माझी टीम खूप निराश झालो.” अशी खंत तिने व्यक्त केली आहे.
“कदाचित माझ्यासारखेच, तुम्हालाही यावेळी नकाराचा सामना करावा लागत असेल. जर तुमच्यासोबतही असे काही घडले असेल तर मला सांगा.” #rejected सोबत तुमची कहाणी शेअर करा आणि मला टॅग करा. मी तुमची कहाणी माझ्या इन्स्टा स्टोरीवर शेअर करेन जेणेकरून लोकांना प्रेरणा मिळेल.” असे देखील ती म्हणाली आहे.





