मदतकार्यात अर्बन बॅंकेचा खारीचा वाटा : मिश्रा
Updated On:

नगर (प्रतिनिधी) -नगर अर्बन बॅंकेच्या सर्व कार्माचाऱ्यांनी एक दिवसाचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिला आहे. दोन लाख बहात्तर हजार रुपयांची मदत राज्य सरकारला केली आहे. ही जरी छोटी मदत असली तरी प्रशासन करीत असलेल्या मदत कार्यात अर्बन बॅंकेने खारीचा वाटा उचलला आहे, असे प्रतिपादन नगर अर्बन बॅंकेचे प्रशासक सुभाषचंद्र मिश्रा यांनी केले.
नगर अर्बन बॅंकेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी करोना उपाय योजनांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी साठी एक दिवसाचा पगार दिला आहे.
दोन लाख बहात्तर हजार रुपयांचा मदतीचा धनादेश बॅंकेचे प्रशासक सुभाषचंद्र मिश्रा यांनी मनपाचे उपयुक्त डॉ. प्रदीप पठारे यांच्या कडे सुपूर्द केला.





