UPSC: यूपीएससी मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर
UPSC:

२,५२६ उमेदवार मुलाखतीसाठी पात्र; ११ नोव्हेंबरपासून अर्ज प्रक्रिया
UPSC: केंद्रीय लोकसेवा आयोगाने नागरी सेवा मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. या परीक्षेत सहभागी झालेल्या एकूण १३,३४३ उमेदवारांपैकी २,५२६ उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरले आहेत.
मुख्य परीक्षेला बसलेल्यांपैकी सुमारे १८.९३ टक्के उमेदवारच या अंतिम टप्प्यात पोहोचले असून, दर पाच उमेदवारांमागे एकाला मुलाखतीची संधी मिळाली आहे.
यशस्वी उमेदवार आता आयएएस, आयपीएस, आयएफएस आणि इतर केंद्रीय सेवांच्या ग्रुप ‘ए’ व ‘बी’ पदांच्या निवडीसाठी पात्र ठरले आहेत. मुलाखतीच्या तारखा आयोगाकडून स्वतंत्रपणे जाहीर केल्या जातील.
पात्र उमेदवारांना ११ नोव्हेंबर २०२६ ते २५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत आयोगाच्या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज भरावा किंवा अपडेट करावा लागेल. ज्यांना बदल करायचे नाहीत, त्यांनाही हा फॉर्म सबमिट करणे बंधनकारक आहे.
पूर्व परीक्षेत ‘ऍपियरिंग’ असलेल्यांना आता उत्तीर्ण झाल्याचा पुरावा द्यावा लागेल. ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास मुलाखतीचे प्रवेशपत्र मिळणार नाही आणि उमेदवारी रद्द होऊ शकते. उमेदवारांनी वेळेत सर्व कागदपत्रे आणि माहिती अचूक भरण्याचे आवाहन आयोगाने केले आहे.





