जम्मू-काश्मीर विधानसभेत कलम 370 वरुन पुन्हा एकदा गदारोळ; आमदार एकमेकांविरोधात भिडले

Jammu and Kashmir Assembly Clash | जम्मू-काश्मीर विधानसभेत आज पुन्हा एकदा गदारोळ पाहायला मिळाला. कलम 370 वरून सभागृहात आजही वातावरण तापले होते. जम्मू-काश्मीर विधानसभेत भाजप आणि नॅशनल कॉन्फरन्सच्या आमदारांमध्ये पुन्हा बाचाबाची आणि हाणामारी झाली.
खासदार इंजिनिअर राशिद यांचे बंधू आणि अवामी इत्तेहाद पक्षाचे आमदार खुर्शीद अहमद शेख यांनी आज पुन्हा कलम 370 लागू करण्यासंदर्भात पोस्टर दाखविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी भाजपच्या आमदारांनी खुर्शीद अहमद शेख यांना रोखले. खुर्शीद अहमद शेख हे बारामुल्लाचे लोकसभा खासदार अभियंता रशीद यांचे भाऊ आहेत.
विधानसभेत झालेल्या गदारोळात मार्शल यांनी खुर्शीद अहमद शेख यांना सभागृहाबाहेर काढले. तसेच भाजपच्या काही आमदारांनाही सभागृहाबाहेर काढले. कलम 370 विरोधात आणलेल्या प्रस्तावाला भाजप सभागृहात सातत्याने विरोध करत आहे. आज गदारोळ सुरू झाल्यानंतर पीडीपीच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. अधिवेशन सुरू होताच भाजप आमदारांनी पीडीपी आणि सभापतींच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेध करण्यास सुरुवात केली.
#WATCH | Srinagar | Ruckus erupts in J&K assembly; Engineer Rashid’s brother & Awami Ittehad Party MLA, Khurshid Ahmad Sheikh marshalled out of the House; Slogans raised against PDP pic.twitter.com/jpir2BrEYK
— ANI (@ANI) November 8, 2024
जम्मू-काश्मीर विधानसभेत मोठा गदारोळ
दरम्यान, गुरुवारीही जम्मू-काश्मीर विधानसभेत मोठा गदारोळ झाला होता. कलम 370 हटवण्याचे विधेयक मंजूर झाल्यानंतर संतप्त जमाव सरकारच्या विरोधात घोषणा देत होता. दरम्यान, लंगेट विधानसभा मतदारसंघातील अवामी इत्तेहाद पक्षाचे आमदार खुर्शीद अहमद शेख यांनी कलम 370 हटवण्यासंबंधीचा बॅनर सभागृहात दाखवण्यास सुरुवात केली होती.
यानंतर पक्ष आणि विरोधी आमदारांमध्ये बाचाबाची सुरू झाली. भाजप नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते सुनील शर्मा यांनी बॅनर दाखवण्यास विरोध केला. गोंधळ वाढल्याने मार्शलला बचावासाठी यावे लागले. यानंतर सभागृहाचे कामकाज काही काळासाठी तहकूब करण्यात आले होते.
हेही वाचा :





