‘आक्रंदन’ चित्रपटात साकारणार उपेंद्र लिमये ‘ही’ दमदार भूमिका
Updated On:

मुंबई – ‘जोगवा’, ‘यलो’, ‘मुळशी पॅटर्न’ अशा विविध चित्रपटांमधून आपल्या दमदार अभिनयाने प्रत्येक भूमिकेला योग्य न्याय देणारा अभिनेता ‘उपेंद्र लिमये’ लवकरच एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. उपेंद्र आपल्या आगामी ‘आक्रंदन’ या मराठी चित्रपटात एका सरकारी वकिलाच्या भूमिकेत दिसणार आहे. उपेंद्र कायमच आपल्या कसदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकत आला आहे.
‘आक्रंदन’ हा चित्रपट २९ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘वंदे मातरम फिल्मस’ चे विवेक पंडित या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते असून ‘पार्वती पुत्र प्रॉडक्शन्स’च्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. या उपेंद्र आदित्य जहागिरदार या वकिलाची व्यक्तिरेखा साकारत आहे.





