शीख धर्मप्रवचनकाराचा मृत्यू; संपर्कात आलेले 15 गावं सील
Updated On:

अमृतसर : कोरोना विषाणूमुळे एका शीख धर्मप्रवचनकाराचा मृत्यू झाला आहे. या प्रवचनकाराच्या संपर्कात आलेल्या १५ हजार लोकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. हे प्रवचनकार यूरोपच्या दौऱ्यावरून भारतात परतले होते.
त्यांनी युरोपमधून आल्यानंतर पंजाब राज्यात अनेक ठिकाणी प्रवचन दिले होते. त्यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांच्या त्यांच्या संपर्कात आलेल्या १९ जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती पोलीस उपायुक्त विनय बुबलानी यांनी दिली. त्यांच्या ज्या- ज्या गावाशी संपर्क आला त्या सर्व १५ गावांना सील करण्यात आले आहे.





