Kriti Sanon : क्रिती सेनॉन हॉरर चित्रपटात दिसणार; नव्या प्रोजेक्टची अपडेट समोर
Kriti Sanon : क्रिती पहिल्यांदाच एका वेगळ्या भूमिकेत दिसणार

Kriti Sanon : अभिनेत्री क्रिती सेनॉन एका हॉरर चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकतीच तिच्या आगामी प्रोजेक्टबद्दल माहिती समोर आली आहे. गेल्या काही वर्षांत हॉरर चित्रपटांची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली असून प्रेक्षकांकडून या प्रकारच्या चित्रपटांना मोठा प्रतिसाद मिळत आहे. मात्र, हा चित्रपट प्रेक्षकांना खऱ्या अर्थाने भीतीचा सामना करायला लावणारा आहे.
मिडिया रिपोर्टनुसार, ‘भेडिया’ नंतर कृती सॅनॉनला मॅडॉक फिल्म्सकडून एक बिग बजेट चित्रपटाची ऑफर मिळाला आहे. क्रितीने या नव्या चित्रपटासाठी होकार दिला असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, चित्रपटाची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. यामध्ये क्रिती पहिल्यांदाच एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. सध्या या प्रोजेक्टवर काम सुरु असून प्री-प्रोडक्शनला सुरुवात झाल्याचे सांगितले जात आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून क्रिती मॅडॉक फिल्म्ससोबत जोडलेली आहे. मॅडॉक फिल्म्स ही निर्मिती संस्था ‘भेडिया’, ‘स्त्री’ आणि ‘स्त्री २’ सारख्या हॉरर-कॉमेडी जॉनरच्या निर्मितीसाठी ओळखली जाते. मात्र, या प्रोडक्शन हाऊसने ‘मुंज्या’ आणि ‘रुही’ यांसारखे हॉरर चित्रपटही निर्मित केले आहेत. कृतीचा हॉरर चित्रपट या यादीतील तिसरा चित्रपट असेल.
‘मिमी’ नंतर या प्रोडक्शन हाऊससोबतचा हा तिचा हा मुख्य भूमिकेतील चित्रपट असेल. कृतीचा ‘मिमी’ चित्रपटही अनेकांच्या पसंतीस उतरला. विशेष म्हणजे या चित्रपटासाठी तिला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. यानंतर आता क्रिती तिच्या आगामी हॉरर चित्रपटात एका वेगळ्या भूमिकेत दिसणार असल्याने चाहत्यांचीही उत्सुकता वाढली आहे.
हेही वाचा:
Uddhav Thackeray: दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कवर ठाकरेंचीच ‘गर्जना’; उद्धवसेनेचा मार्ग मोकळा…





