JP Nadda : आगामी महापालिका निवडणुका; भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आज पुणे दौऱ्यावर

JP Nadda : महाराष्ट्रात सध्या सगळीकडे गणेशोत्सवाचे भक्तीमय वातावरण आहे. दुसरीकडे मुंबईतील आझाद मैदानावर मनोज जरांगे मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी उपोषणाला बसले आहेत. अशातच आता महाराष्ट्रात आज भाजपचे दोन मोठे नेते येणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा हे दोन्ही नेते आज महाराष्ट्रात येणार आहेत.
अमित शाहांचे काल रात्री मुंबई विमानतळावर आगमन झालं आहे. त्यांचं स्वागत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. तर दुसरीकडे केंद्रीय मंत्री जे. पी नड्डा हे पुण्यात येणार आहे. पुण्यात आल्यानंतर ते पुण्यातील गणेश मंडळांना भेट देणार आहेत. मात्र, ते जरी गणेश मंडळांना भेटी देणार असले तरी त्यांच्या भेटीला दुसरी एक गोष्ट चर्चेली जात आहे. ती म्हणजे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका.
नुकतीच पुण्यासह राज्यभरातील काही महापालिकेंच्या प्रारुप प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. पुण्याच्या प्रभाग रचनेवर भाजपचा वरचष्मा असल्याचं बोललं जात आहे. यामुळे आता दिवाळीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं बिगुल वाजणार आहे. त्यामुळे नड्डा यांच्या पुणे दौऱ्याला विशेष महत्व प्राप्त झालं आहे.
पुण्यात आल्यानंतर नडा सर्वप्रथम पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या कोथरुड येथील मंडळांना भेट देणार आहेत. त्यानंतर ते पुण्यातील अन्य गणपती मंडळांना भेट देणार असून, भाजपच्या नेत्यांच्याही घरी जाणार आहेत. यामुळे या भेटी दरम्यान राजकीय चर्चा होणार का? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
या मंडळांना भेट देणार
दर्शन-1 श्री साई मित्र मंडळ, कोथरुड सकाळी 11:45
दर्शन- 2 प्रकाश जावडेकर यांचे निवासस्थान दुपारी 12:20
दर्शन – 3 राजेश पांडेय यांचे निवास्थान दुपारी 1:00
दर्शन- 4 श्री कसबा गणपती मंडळ दुपारी 02:20
दर्शन- 5 श्रीमंच भाऊ रंगारी गणेश मंडळ दुपारी 02:50
दर्शन – 6 श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट 03:20
दर्शन-7 साने गुरुजी तरुण मंडळ दुपारी 03:50
दर्शन – 8 जगदीश मुळीक निवास्थान रात्री 08:30





