UP Election: शिवसेनेने पाठिंबा दिलेला उमेदवार चपलांचा हार घालून का करतोय प्रचार ?

लखनौ – आगामी काळात पाच राज्यांत विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. मात्र या पाच राज्यांपैकी सर्वाधिक चर्चेचा विषय ठरतीये उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक. उत्तर प्रदेश राज्यच दिल्लीतील सत्ता ठरवत असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी ताकद लावली आहे. प्रमुख लढत भाजप आणि समाजवादी पक्षात असली, तरी शिवसेना देखील मैदानात उतरली आहे.
शिवसेनेने अनेक ठिकाणी उमेदावर दिले आहेत. तर काही ठिकाणी अपक्षांना पाठिंबा दिला आहे. शिवसेनेने पाठिंबा दिलेला एक उमेदवार गळ्यात चपलाची माळ घालून फिरत आहे. त्यामुळे हा चर्चेचा विषय ठरत आहे.
अलिगढ विधानसभा मतदारसंघातील पंडित केशव देव असं या उमेदवाराचं नाव आहे. अपक्ष उमेदवारी दाखल केलेल्या पंडित केशव देव यांना शिवसेनेनं पाठिंबा दिला आहे. त्यांचं निवडणूक चिन्ह चप्पल आहे.
दरम्यान, निवडणूक चिन्हच चप्पल असल्यामुळे केशव देव गळ्यात चपलांचा हार घालून आपला प्रचार करत आहेत. भाजप नेते धमक्या देत असल्याचा आरोप केशव देव यांनी केला. त्याचवेळी त्यांनी भाजपकडून आपल्याला धोका असल्याचं म्हणत सुरक्षेची मागणी केली आहे.





