#UP Election 2022: भाजप केवळ माझ्या कुटुंबाच्याच विरोधात- प्रियंका

कुशीनगर, (उत्तर प्रदेश )- उत्तर प्रदेशमधील निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सातत्याने घराणेशाहीवर टीका केली आहे. मात्र कारण आपले कुटुंब त्यांच्या समोर झुकलेले नाही. म्हणून भाजपने केवळ आपल्याच कुटुंबाला लक्ष्य केले आहे, अशी टीका कॉंग्रेस नेत्या प्रियंका गांधी वढेरा यांनी केली आहे.
पंतप्रधानांनी समाजवादी पार्टीला उद्देशून “घोर परिवारवादी’ असे संबोधले होते. या भाषणामध्ये बोलताना “घराणेशाही केवळ आपल्या कुटुंबाचा विचार करतात.’ अशी टीका केली होती. मात्र राजकारण्यांची मुले त्यांच्याच पक्षाचे काम करतात तेंव्हा घराणेशाही होते. मात्र ही मुले भाजपमध्ये गेल्यास टीका केली जात नाही. असेही प्रियंका गांधी म्हणाल्या.
ज्योतिरादित्य सिंदीया, जितीन प्रासादा, आरपीएन सिंह या दुसऱ्या पिढीतील युवा नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या संदर्भाने त्या बोलत होत्या.
उत्साह वाढवणारा निकाल येईल
कॉंग्रेस उत्तर प्रदेशात अनेक वर्षांनी विधानसभेच्या 400 जागा लढवत आहे. यावेळच्या निवडणुकीचा निकाल पक्षाचा उत्साह वाढवणारा असेल, असा विश्वास प्रियंका गांधी यांनी व्यक्त केला. कॉंग्रेसचे उमेदवार ताकदीने निवडणूक लढवत आहेत. अनेक जागांवर पक्षाच्या उमेदवारांनी प्रतिस्पर्ध्यांपुढे तगडे आव्हान उभे केले आहे. निवडणुकीनंतर सरकार स्थापनेसाठी कॉंग्रेस इतर पक्षाला पाठिंबा देणार का, या प्रश्नावर निकालानंतर पाहू, असे उत्तर त्यांनी दिले.





