Rohini Khadse : भाजप आमदार चित्रा वाघ यांनी एलपीजीचा पुरवठा सुरळीतपणे सुरू असल्याचे विधान केले होते. आता या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी जोरदार प्रहार चित्रा वाघ यांच्यावर केला आहे. चित्रा वाघ यांच्या विधानाचा समाचार घेत रोहिणी खडसे यांनी सिलिंडर येत नाही तोपर्यंत १२ दिवस आम्ही सामान्य माणसांनी तुमच्या घरी जेवायला यायचं का? वि’चित्रा’ ताई ? असा संतप्त सवाल केला आहे. रोहिणी खडसे यांनी आपल्या एक्स हँडलवर या संदर्भात ट्वीट केले आहे. त्यांनी केलेल्या या ट्वीटवर आता चित्रा वाघ काय प्रत्युत्तर देणार हे पाहावे लागणार आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या आखाती देशांमधील युद्धाची झळ भारताला सोसावी लागत आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे इराणने सामुध्रधुनीवर कच्चे तेल आणि एलपीजी पुरवठा थांबवला आहे. तसेच इतर आयात निर्यातही बंद केली आहे. त्यामुळे गॅस सिलेंडर्सची टंचाई निर्माण झाली असून, काहीजणांकडून सिलेंडर्स ब्लॅकने दिले जाण्याचे धक्कादायक प्रकार समोर आलेले आहेत. हेही वाचा : Kolkata team : आयपीएल सुरू होण्यापूर्वीच KKR ला मोठा झटका! ‘या’ खेळाडूची टीममधून एक्सिट नेमकं काय म्हणाल्या रोहिणी खडसे? काल गॅस सिलिंडरच्या तुटवड्यावर काँग्रेस नेते आंदोलन करत असताना वि’चित्रा’ ताई तिथे टपकल्या आणि सवयीप्रमाणे नाक खुपसले. वि’चित्रा’ ताई म्हणाल्या की, सिलिंडर आहेत.. २५ दिवसांत मिळते सिलिंडर.. बुक करायला सांगा… अहो विचित्रा ताई… जर एका सामान्य गृहिणीच्या घराचा गॅस, आज संपला असेल तर त्यांनी काय करावं? २५ दिवस वाट पहावी का ? बरं पाहतो वाट ! पण मग गॅस येईपर्यंत आम्ही सामान्य माणसांनी तुमच्या घरी जेवायला यायचं का? वि’चित्रा’ ताई?, असे संतप्त सवाल करत रोहिणी खडसे यांनी चित्रा वाघ यांच्यावर जोरदार प्रहार केला आहे. विरोधकांकडून निदर्शने गॅस सिलेंडरच्या तुटवड्याच्या मुद्द्यावरून महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांनी राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरले. काँग्रेस नेते नाना पटोले, विजय वडेट्टीवार यांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर गॅस सिलेंडरची प्रतिकृती हाती घेत जोरदार निदर्शने केली. घाबरुन न जाण्याचे आवाहन केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून नागरिकांना घाबरुन न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पुरवठा सुरळीत सुरू ठेवण्यासाठी राज्य सरकारकडून सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. हेही वाचा : Aishwarya Narkar : ‘कॅमेरासमोर तरी फूल कपडे घालून योगा करा’; ट्रोल करणाऱ्याला ऐश्वर्या नारकरांनी सुनावले खडेबोल