केळगावच्या उपसरपंचपदी पार्वती शंकर म्हस्के यांची बिनविरोध निवड

चिंबळी (वार्ताहर) – केळगाव (ता खेड) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदावर पार्वती शंकर म्हस्के यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. लता विरकर यांनी स्वखुशीने उपसरपंचपदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. या पदासाठी म्हस्के यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याची माहिती ग्रामसेसिका लिना रासकर यांनी दिली.
यावेळी सरपंच गुंफाबाई ठाकर, माजी उपसरपंच लता विरकर, किरण मुंगसे, रूपाली मुंगसे, सुधीर वहिले, पार्वती म्हस्के, ज्योती वहिले, अक्षय मुंगसे, दत्तात्रय मुंगसे, अश्विनी गायकवाड, नामदेव मुंगसे उपस्थित होते.
केळगाव (ता खेड) येथील ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांना काम करण्याची संधी मिळावी या हेतूने उपसरपंच लता विरकर यांनी
स्वखुशीने उपसरपंच पदाचा राजीनामा दिला. या रिक्त जागेसाठी सरपंच गुंफाबाई ठाकर यांच्या अध्यक्षतेखालील ग्रामपंचायत कार्यालयात घेण्यात आलेल्या उपसंरपच पदासाठी पार्वती शंकर म्हस्के यांचा एकमेव अर्ज दाखल करण्यात आला असल्याने उपसंरपच पदी पार्वती म्हस्के बिनविरोध निवड झाली असल्याचे घोषित करण्यात आले.
यावेळी नवनिर्वाचित उपसंरपच पार्वती शंकर म्हस्के यांचा ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमानाने शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. पारंपारिक पध्दतीने वांजत्री ताफा लावून भंडाराची उधळण करीत मिरवणूक काढण्यात आली याप्रसंगी समस्त ग्रामस्थ व सर्व कर्मचारीवर्ग उपस्थित होते.





