केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांच्याकडे अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार

नवी दिल्ली – केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्री किरण रिज्जीजू यांच्याकडे अन्नप्रक्रिया उद्योगाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. काल राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी पशुपतीकुमार पारस यांचा मंत्रिपदाचा राजीनामा स्वीकारला होता. पारस यांच्याकडे अन्नप्रक्रिया उद्योगाचे मंत्रीपद होते. (Union minister Kiren Rijiju gets additional charge of food processing industries ministry)
आता हे पद रिज्जीजू यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. या संदर्भात रिज्जीजू यांनी समाज माध्यमावर म्हटले आहे की, सध्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. मात्र अचानक निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे या मंत्रालयाचा पदभार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझ्याकडे सोपविला आहे. आम्ही वेळ वाया न घालवता प्रत्येक विभागाचे कामकाज पाहत आहोत. त्यामुळे विकसित भारत होण्यास चालना मिळणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.





