विविध देशांबरोबरच्या सामंजस्य करारांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी

नवी दिल्ली – विज्ञान, तंत्रज्ञान, वैद्यकीय उत्पादने आणि डिजीटल उपाय योजनांशी संबंधित विषयांमधील सहकार्यासाठी विविध देशांबरोबर करण्यात आलेल्या सामंजस्य करारांना आज केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूरी दिली. यामध्ये डॉमनिक रिपब्लिक, केनिया, इक्वाडोर, नेदरलॅन्ड आणि युरोपीय संघाबरोबरच्या सामंजस्य करारांचा समावेश आहे.
डॉमिनिकन प्रजासत्ताकचे सार्वजनिक आरोग्य आणि सामाजिक सहाय्यक मंत्रालयाचे औषध, अन्न आणि स्वच्छताविषयक उत्पादने संघटना महासंचालनालय यांच्यात वैद्यकीय उत्पादने नियमन क्षेत्रातील सहकार्याबाबत एका सामंजस्य करारावर गेल्या वर्षी 4 ऑक्टोबर रोजी स्वाक्षरी करण्यात आली आहे. या सामंजस्य करारामुळे वैद्यकीय उत्पादनांची निर्यात सुलभ होईल भारत आणि केनियामध्ये डिजिटल परिवर्तन घडवण्यासाठी व्यापक स्तरावर, डिजिटल उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी सहयोग करण्याविषयी जिसेंबरमध्ये करार झाला आहे.
तसेच वैद्यकीय उत्पादने नियमन क्षेत्रातील सहकार्यावर स्वाक्षरी झाली आहे. नेदरलॅन्डबरोबर नोव्हेंबरमध्ये झालेल्या करारानुसार औषध निर्मितीसाठी कच्चा माल, जैविक उत्पादने, वैद्यकीय उपकरणे आणि कॉस्मेटिक उत्पादने यासह औषध निर्मितीच्या संदर्भात वैद्यकीय उत्पादनांचे नियमन अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास सुलभ करेल.





