‘अर्थसंकल्प राष्ट्रपतींच्या भाषणाप्रमाणेच निरुपयोगी’, बजेटच्या प्रक्रियेवर काँग्रेसच्या खासदाराची जोरदार टीका

Union Budget 2025: अर्थमंत्री निर्मला सीतारमन आज संसदेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. सकाळी 11 वाजता लोकसभेत देशाचा अर्थसंकल्प मांडला जाईल. त्याआधी अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवनात भेट देखील घेतली आहे.
यातच अर्थसंकल्प सादर करण्याच्या काही तासांआधीच काँग्रेस काँग्रेस खासदार मनीष तिवारी यांनी बजेटच्या प्रक्रियेवर टीका केली आहे. ही केवळ ‘अकाउंटिंग एक्सरसाइज’ असल्याचे म्हणत त्यांनी ‘राष्ट्रपतीच्या अभिभाषणाप्रमाणे बिनकामाचे असल्याचे म्हटले आहे.
मनीष तिवारी यांनी एक्सवर (ट्विटर) पोस्ट करत अर्थसंकल्पावरुन सरकारवर निशाणा साधला आहे. मनीष तिवारी म्हणाले की, ‘बजेट काय आहे? हे अकाउंटिंग एक्सरसाइजपेक्षा अधिक काहीच नाही. सरकारने किती कमावले आणि किती खर्च केले याचा हिशोब फक्त. गेल्या काही वर्षांत ते अर्थमंत्र्यांसाठी केवळ एक वार्षिक दिखाऊ सोहळा झाले आहे.’
What is a budget ?
It is nothing more than an accounting excersize.
How much did Government earn and how much did it spend .
Over the years it has evolved into an annual grandstanding ritual for the Finance Minister.
It is as useless a ritual as the President address.
The…— Manish Tewari (@ManishTewari) February 1, 2025
हे राष्ट्रपतींच्या भाषणाइतकेच निरुपयोगी आहे. सरकारचे उत्पन्न आणि खर्चाचे विवरण सभागृहात सादर केले तरी पुरेसे आहे, असे म्हणत त्यांनी मनीष तिवारी यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर निशाणा साधला आहे.
याआधी देखील मनीष तिवारी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर टीका केली होती. ‘दुर्दैवाने राष्ट्रपतींचे अभिभाषण हे सरकारच्या कथित कामगिरीच्या लांबलचक यादीची पुनरावृत्ती आहे. राष्ट्रपतींना त्यांचे मत मांडण्याची परवानगी दिली पाहिजे, असे ते म्हणाले होते.
दरम्यान, अर्थमंत्री निर्मला सीतारमन आज संसदेत अर्थसंकल्प सादर करतील. या अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.





