धक्कादायक…! भारतात 6 लाख मुले लसीकरणापासून ‘वंचित’

Unicef Report । लहान मुलांसाठी लस घेणे खूप महत्वाचे आहे. मात्र नुकताच आलेल्या रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. 2023 मध्ये, जगभरात 14.5 दशलक्ष मुले लसीकरणापासून वंचित राहिले आहे. 21 दशलक्ष अपूर्णपणे लसीकरण झाले आहेत. गोवर लसीकरण न करण्याच्या बाबतीत, भारत 16 लाख मुलांसह तिसऱ्या स्थानावर आहे, तर नायजेरिया (28 लाख) पहिल्या आणि काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक दुसऱ्या स्थानावर आहे.
UNICEF च्या मते,
‘2023 मध्ये लसीकरण न झालेल्या मुलांच्या संख्येत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. येथे 16 लाख मुले आहे, ज्यांना कोणतीही लस मिळालेली नाही. नायजेरिया पहिल्या क्रमांकावर आहे जिथे अशा मुलांची संख्या 21 लाख आहे.
जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि युनिसेफ यांच्या अहवालातून ही माहिती मिळाली आहे. या अहवालात, 1 जुलै 2024 पर्यंत देशांनी दिलेल्या माहितीच्या आधारे 2023 वर्षासाठी लसीकरण कव्हरेजचा अंदाज लावला आहे. या अहवालासाठी 2024 साठी जागतिक बँकेचे विकास निर्देशक आणि संयुक्त राष्ट्र लोकसंख्या विभागाचा 2024 डेटा देखील वापरण्यात आला आहे.
Unicef Report । अहवालात आणखी काय नमूद केले आहे?
– गेल्या वर्षीच्या तुलनेत लसीकरण न झालेल्या बालकांच्या संख्येत किंचित वाढ झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. आता अशा मुलांची संख्या १ कोटी ३९ लाखांवरून १ कोटी ४५ लाख झाली आहे.
-ही संख्या देखील 2019 च्या तुलनेत 17 लाखांनी जास्त आहे. काही मुलांना पहिली लस दिल्यानंतर तिसरी लस देता येत नसल्याचेही अहवालात म्हटले आहे. अशाप्रकारे, लसीकरण न झालेल्या किंवा अपूर्ण लसीकरण न झालेल्या बालकांची एकूण संख्या 2023 मध्ये 2 कोटी 10 लाख झाली आहे, जी आधीच्या आकडेवारीपेक्षा 27 लाख अधिक आहे.
Unicef Report । भारतात गोवर लसीकरण न झालेल्या बालकांची संख्याही तिसऱ्या क्रमांकावर
भारतात गोवर लसीकरण न झालेल्या बालकांची संख्याही तिसऱ्या क्रमांकावर आहे. अशा मुलांची संख्या 16 लाख आहे. नायजेरिया (28 लाख) आणि डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो (20 लाख) पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर आहेत. जगभरातील लसीकरण न झालेल्या मुलांपैकी 55% दहा देशांमध्ये आहेत आणि भारत त्यापैकी एक आहे.





