दुर्दैवी.! मेट्रोच्या गर्डची लोखंडी प्लेट पडून पादचारी महिलेचा अंत; परिसरात उडाली खळबळ

ठाणे – ठाणे शहरात एक दुर्दैवी घटना घडल्याचं समोर आलं आहे. गुरुवारी सकाळी शहरातील कॅडबरी सिग्नलच्या परिसरात मेट्रो-4 प्रकल्पाचे बांधकाम सुरु असताना गर्डरची लोखंडी प्लेट थेट खाली कोसळली आहे. मात्र, ही प्लेट थेट एका महिलेच्या अंगावर पडली असून, यामध्ये महिला खाली दबली गेली. सुनीता कांबळे असं या महिलेचं नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ठाण्यात वडाळा-घाटकोपर-कासारवडवली या मेट्रो चारच्या मार्गिकेचे काम सुरू आहे. मेट्रो गर्डरच्या सपोर्टसाठी खड्ड्यात ही प्लेट लावण्यात आली होती. आणि गुरुवारी सकाळी हीच प्लेट रस्ता ओलंडताना थेट खाली कोसळून महिलेच्या अंगावर पडली आहे. यावेळी महिला खाली दबली गेली असून, त्यांचा मृत्यू झाला. या घटने मुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मात्र, दुर्घटना घडल्यानंतर स्थानिक लोक तातडीने महिलेच्या मदतीला धावून गेले, त्यांनी महिलेला लोखंडी प्लेटखालून बाहेर खेचून काढले. त्यानंतर नागरिकांनी स्थानिक पोलिसांना घटनेची संपूर्ण माहिती दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आणि महिलेचा मृतदेह बाहेर काढला. तिला उपचारासाठी तात्काळ ठाणे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांनी या महिलेला मृत म्हणून घोषित केले.





