दुर्दैवी घटना..! पत्नी अन् नवजात बाळाला भेटण्यासाठी आलेल्या लष्करी जवानाचा अपघाती मृत्यू

नवी दिल्ली – मध्य प्रदेशच्या रिवा जिल्ह्यात एक दुर्दैवी घटना घडली आहे. एका लष्करी जवानाचा रस्ता अपघातात मृत्यू झाला असल्याचे समोर आले आहे. लष्करी जवानाच्या पत्नीने एक दिवसापूर्वीच नवजात बाळाला जन्म दिला होता. त्या बाळाला आणि पत्नीला भेटण्यासाठी जात असतानाचा जवानाचा मृत्यू झाला आहे.
या घटने मुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सनी पटेल (वय 30 वर्ष) असे त्याचे नाव असून तो आसाममध्ये कॉन्स्टेबल पदावर कार्यरत होता. पत्नीच्या प्रसूतीची बातमी समजल्यानंतर जवान रजा घेऊन रेवा येथील आपल्या घरी पोहचला होता. आणि या दरम्यानच त्याचा दुरदैवी मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, लष्करी जवानाच्या अपघाताच्या एक दिवस आधी शुक्रवारी त्याच्या पत्नीने नवजात मुलाला जन्म दिला होता. पत्नीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी आपल्या पत्नीला आणि बाळाला भेटून लष्कराचे जवान रुग्णालयातून घराच्या दिशेने निघाले होते. त्याचवेळी अचानक एक गाय समोर आली. या गाईला वाचविण्याचा प्रयत्न केला असता,
त्यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि त्यांना ट्रकने धडक दिली. या घटनेनंत स्थानिकांसह पोलीस प्रशासनाने घटनास्थळ गाठून लष्कराच्या जवानाला गंभीर अवस्थेत तातडीने संजय गांधी रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सध्या पोलीस अधिकारी या घटनेचा अधिक तपास करत आहेत.





