Duleep Trophy 2024-25 : मयंक अग्रवालच्या भारत-अ संघाने पटकावलं दुलीप ट्रॉफीचे विजेतेपद….

Duleep Trophy 2024 (India A vs India C, 6th Match) : दुलीप ट्रॉफी 2024 च्या तिसऱ्या टप्प्यातील सामन्यात, मयंक अग्रवालच्या नेतृत्वाखाली भारत-अ संघाने रुतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील भारत-क संघाचा 132 धावांनी पराभव केला. या विजयासह भारत-अ संघाने गुणतालिकेत पहिले स्थान मिळवून दुलीप ट्रॉफी 2024 चे विजेतेपद पटकावले आहे. भारत-अ संघासाठी शाश्वत रावतने पहिल्या डावात शतक आणि दुसऱ्या डावात अर्धशतक झळकावून संघाच्या विजयात महत्वपूर्ण योगदान दिले. या कामगिरीसाठी त्याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.
दुलीप ट्रॉफीच्या तीन सामन्यांपैकी भारत-अ संघाने दोन जिंकले होते आणि एक सामना गमावला होता. दोन विजयांसह या संघाचे सर्वाधिक 12 गुण झाले आणि या जोरावर संघ चॅम्पियन बनला. यासह भारत-अ संघाने 61व्यांदा दुलीप ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले आहे. या स्पर्धेत भारत-क 9 गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर राहिला.
𝐂. 𝐇. 𝐀. 𝐌. 𝐏. 𝐈. 𝐎. 𝐍. 𝐒! 🏆
Congratulations to India A on winning the #DuleepTrophy 2024-25 👏@IDFCFIRSTBank pic.twitter.com/Vyz9kL32GO
— BCCI Domestic (@BCCIdomestic) September 22, 2024
दुलीप ट्रॉफी 2024 च्या पहिल्या सामन्यात भारत-अ चे नेतृत्व शुभमन गिलने केले होते आणि या सामन्यात भारत-अ संघाचा भारत-ब संघाकडून 76 धावांनी पराभव झाला होता. या सामन्यानंतर गिल बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिका खेळण्यासाठी टीम इंडियात सामील झाला आणि संघाचे कर्णधारपद मयंक अग्रवालकडे सोपवण्यात आले. मयंकच्या नेतृत्वाखाली या स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात भारत-अ संघाने पुनरागमन करत भारत-ड संघाचा 186 धावांनी पराभव केला तर तिसऱ्या सामन्यात भारत-अ संघाने भारत-क संघाचा 132 धावांनी पराभव करत विजेतेपदावर कब्जा केला.
That Winning Feeling! 🤗
India A captain Mayank Agarwal receives the coveted #DuleepTrophy 🏆
The celebrations begin 🎉@IDFCFIRSTBank
Scorecard ▶️: https://t.co/QkxvrUmPs1 pic.twitter.com/BH9H6lJa8w
— BCCI Domestic (@BCCIdomestic) September 22, 2024
असा झाला सामना…..
भारत-अ : पहिला डाव
रुतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील भारत-क संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर भारत-अ संघाने प्रथम फंलदाजी करताना पहिल्या डावात सर्वबाद 297 धावसंख्येपर्यत मजल मारली होती. यादरम्यान शाश्वतने अप्रतिम फलंदाजी केली. त्याने 250 चेंडूंचा सामना करताना 15 चौकारांच्या मदतीने 124 धावांची खेळी केली. तर आवेश खानने नाबाद अर्धशतक झळकावले. त्याने 68 चेंडूत 51 धावा केल्या. तर गोलंदाजीत भारत-क संघाकडून विजयकुमार विशकन सर्वाधिक 4, अंशुल कंबोजने 3 तर गौरव यादवनं 1 बळी घेतला.
भारत-क : पहिला डाव
प्रत्युत्तरात गायकवाडच्या नेतृत्वाखालील भारत-क संघाचा पहिला डाव 234 धावसंख्येवर आटोपला. यादरम्यान अभिषेक पोरेलने सर्वाधिक 82 धावांची खेळी केली. त्याने 9 चौकार मारले. साई सुदर्शन, कर्णधार गायकवाड प्रत्येकी 17 धावा करून तर रजत पाटीदार शून्यावर बाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. तर पुलकित नारंगने 41 आणि इंद्रजित 34 धावांवर बाद झाला. यादरम्यान गोलंदाजीत भारत-अ संघाकडून आवेश खान आणि आकिब खान या जोडीनं प्रत्येकी 3 बळी तर शम्स मुलाणीनं 2 बळी घेतले.
That Winning Feeling! 🤗
India A captain Mayank Agarwal receives the coveted #DuleepTrophy 🏆
The celebrations begin 🎉@IDFCFIRSTBank
Scorecard ▶️: https://t.co/QkxvrUmPs1 pic.twitter.com/BH9H6lJa8w
— BCCI Domestic (@BCCIdomestic) September 22, 2024
भारत-अ : दुसरा डाव
यानंतर भारत-अ संघाने 8 बाद 286 धावांवर दुसरा डाव घोषित केला आणि पहिल्या डावातील 63 धावांच्या आघाडीच्या जोरावर भारत-क संघासमोर विजयासाठी 350 धावांचे लक्ष्य ठेवले. यादरम्यान रियान परागने 5 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 73 धावांची खेळी केली. शाश्वतने 53 आणि कुशाग्राने 42 धावांचे योगदान दिले तर कर्णधार मंयक अग्रवालने 34 धावांची खेळी केली. तर गोलंदाजीत भारत-क संघाकडून गौरव यादवनं सर्वाधिक 4 तर अंशुल कंबोज आणि मानव सुथारनं प्रत्येकी 2 गडी बाद केले.
भारत-क : दुसरा डाव
विजयासाठी 350 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारत-क संघाला दुसऱ्या डावात भारत-अ संघाने अवघ्या 217 धावसंख्येवर गुंडाळलं आणि 132 धावांनी सामना जिंकत विजेतेपदावर कब्जा केला. कर्णधार गायकवाडने यावेळी 44 धावांचे योगदान दिले. सुदर्शनने 206 चेंडूत 111 धावांची शतकी खेळी खेळली, पण तो संघाला विजयापर्यंत नेऊ शकला नाही. याशिवाय इतर कोणताही फलंदाज इशान किशन (17), रजत पाटीदार (17) अपेक्षित अशी कामगिरी करू न शकल्याने संघाला पराभव स्विकारावा लागला. यादरम्यान भारत-अ संघाकडून गोलंदाजीत प्रसिध्द कृष्णा आणि तनुष कोटियन यांनी प्रत्येकी 3 फलंदाजांना माघारी धाडलं तर आकिब खाननं 2 आणि शम्स मुलाणीनं 1 गडी बाद केला.





