Duleep Trophy 2024 : शाश्वतच्या शतकामुळे भारत-अ तर सॅमसनच्या अर्धशतकाच्या जोरावर भारत-ड मजबूत स्थितीत…

Duleep Trophy 2024 : दुलीप ट्रॉफी 2024 चे दोन सामने अनंतपूर येथे खेळवले जात आहेत. पहिला सामना भारत ब आणि भारत ड तसेच दुसरा भारत अ आणि भारत क यांच्यात खेळला जात आहे. पहिल्या दिवशी दोन्ही सामन्यात 77-77 षटकांचा खेळ झाला.
भारत-अ संघासाठी शाश्वत रावत हा दिवसाचा हिरो ठरला, त्याने दमदार शतक झळकावले, तर भारत-ड संघासाठी संजू सॅमसनने तुफानी खेळी केली. दिवसअखेर तो नाबाद परतला. भारत-ड संघासाठी आणखी तीन फलंदाजांनी अर्धशतके झळकावली आणि संघाची धावसंख्या 300 च्या पुढे गेली.
IND B vs IND D : सॅमसनसह चार खेळाडूंची अर्धशतके, भारत-ड मजबूत स्थितीत…
भारत-ब विरुद्ध भारत-ड सामन्याबद्दल बोलायचे झाले तर भारत-ब ने नाणेफेक जिंकून गोलंदाजी निवडली. अशा स्थितीत भारत-ड संघ फलंदाजीसाठी उतरला आणि देवदत्त पडिक्कल (50) आणि केएस भरत (52) यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. दोघांनी अर्धशतके झळकावली. तर कर्णधार श्रेयस अय्यर पुन्हा एकदा फ्लॉप ठरला. तो खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतला. देवदत्त आणि भरतनंतर रिकी भुईनेही (56) दमदार अर्धशतक झळकावले. त्यानंतर संघ थोडासा गडबडला असला तरी दिवसअखेर संजू सॅमसन आणि सरांश जैन यांच्यात 90 धावांची मोठी भागीदारी झाली.
Stumps Day 1: India D – 306/5 in 76.6 overs (Saransh Jain 26 off 56, Sanju Samson 89 off 83) #IndBvIndD #DuleepTrophy
— BCCI Domestic (@BCCIdomestic) September 19, 2024
पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारत-ड संघाने 77 षटकांनंतर 5 बाद 306 धावा अशी मजल मारली होती. संजू सॅमसन 83 चेंडूत 10 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 89 धावा करून तर सरांश जैन 26 धावा करून नाबाद माघारी परतला. भारत-ब संघाकडून खेळाच्या पहिल्या दिवशी राहुल चहरने पहिल्या डावात सर्वाधिक 3 विकेट घेतल्या तर मुकेश कुमार आणि नवदीप सैनीने प्रत्येकी 1 गडी बाद केला.
IND A vs IND C : शाश्वतच्या शतकामुळे भारत-अ मजबूत स्थितीत…
भारत-अ आणि भारत-क यांच्यातील सुरू असलेल्या सामन्याच्या पहिल्या दिवशी शाश्वत रावतने उत्कृष्ट असे नाबाद शतक झळकावले. त्याच्या शतकाच्या जोरावर भारत-अ संघाने सामन्यात पुनरागमन केले.
Stumps on Day 1!
An action-packed day. 224 runs scored, 7 wickets taken
India A have recovered well courtesy of a fighting ton from Shashwat Rawat
He is still in the middle on 122* along with Avesh Khan #DuleepTrophy | @IDFCFIRSTBank
Scorecard ▶️: https://t.co/QkxvrUnnhz pic.twitter.com/DWmgaGUyZT
— BCCI Domestic (@BCCIdomestic) September 19, 2024
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारत-अ संघाची सुरुवात खूपच खराब झाली. अवघ्या 36 धावांवर त्यांचे पाच फलंदाज पॅव्हेलियनमध्ये गेले होते. यामध्ये प्रथम सिंग (06), मयंक अग्रवाल(06), तिलक वर्मा(05), रियान पराग(02), कुमार कुशाग्र (00) यांचा समावेश होता. यानंतर शाश्वतने शम्स मुलाणीसोबत 87 धावांची आणि आवेश खानसोबत 70 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी करत संघाला मजबूत स्थितीत नेले. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारत-अ संघाने 7 गडी गमावून 224 धावा केल्या होत्या.
Ind vs Ban 1st Test : अश्विन-जडेजाची विक्रमी भागीदारी, मोडित काढला 24 वर्षांचा ऐतिहासिक रेकॉर्ड….
मुलानी 44 धावा करून बाद झाला. शाश्वत 235 चेंडूत 122 धावा करून तर आवेश खान 16 धावा करून नाबाद परतला. भारत-क संघाकडून अंशुल कंबोजने पुन्हा एकदा घातक गोलंदाजी करत तीन बळी घेतले तर विशक विजय कुमारने 2 तर गौरव यादवने 1 गडी बाद केला.





