सरदवाडी येथील सेंट चावरा स्कूल विनापरवाना चालवल्याचे ऊघड; प्रकरण उजेडात येताच पत्रव्यवहार सुरू

शिरूर : शिरूर तालुक्यातील सरदवाडी येथे तब्बल ७ ते ८ वर्ष सेंट चावरा स्कुलने फक्त इरादा पत्रावरच कुठलीही मान्यता न घेता अनाधिकृतपणे शाळा चालवून शासन निर्णयाची पायमल्ली केली असून पालकांची घोर फसवणूक होत आहे. आता हे प्रकरण उजेडात आल्यावर त्यांनी शिक्षण उपसंचालकाकडे मान्यता मिळवण्यासाठी पत्रव्यवहार सुरू केला आहे.
इतके वर्ष विनापरवाना शाळा चालवल्याप्रकरणी शिरूरचे गटशिक्षण आधिकारी आता काय कारवाई करणार? याकडे शिरुर तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे. बेकायदेशीर शाळा सुरु असल्यामुळे राज्य शासन अथवा स्थानिक प्राधिकरणाच्या मान्यता किंवा नाहरकत प्रमाणपत्र शिवाय शाळा चालवण्यात येत असेल तर संबंधितांना १ लाखापर्यंत दंडाची रक्कम व त्यानंतरही शाळा अनधिकृत चालू राहिल्यास रुपये १० हजार प्रती दिवशी दंड करण्याची तरतूद अधिनियमात करण्यात आलेली आहे.
आता प्रत्येक दिवसाला दहा हजार याप्रमाणे ७ वर्षाचा दंड गट शिक्षण आधिकारी ठोठावणार का? तसे न झाल्यास उपोषणाचा इशारा सामाजिक कार्यकत्यानी दिला आहे. एकुणच शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार समोर येत असून ७ वर्ष मान्यता न घेता शाळा सुरू राहीलीच कशी? गट शिक्षण आधिकारी या प्रकरणी गुन्हा दाखल करणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.
लवकरच पत्रव्यवहार करूण मान्यता नसल्याने विनापरवाना शाळा चालवल्यामुळे दंडाची रक्कम ठरवली जाईल. आणि गुन्हाही दाखल केला जाईल.
बाळकृष्ण कळमकर – गटशिक्षण अधिकारी, शिरूर





