उपग्रहाद्वारे रोखली जाणार अनधिकृत बांधकामे

पुणे – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हद्दीतील अनधिकृत बांधकामे शोधण्यासाठी सॅटेलाईटची (उपग्रह) मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. हद्दीत सुरू असलेली बांधकामांची माहिती सॅटेलाइटद्वारे प्राधिकरणाला मिळणार असून या माहितीच्या आधारे “पीएमआरडीए’ अनधिकृत बांधकामांना नोटीस बजावून त्यांच्यावर कारवाई करणार आहे.

“पीएमआरडीए’ हद्दीत सुमारे 15 ते 16 हजार अनधिकृत बांधकामे आहेत. त्यापैकी बहुतांश बांधकामे ही शहरालगतच्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर झाली आहेत. मध्यंतरी त्यापैकी काही बांधकामांना नोटीसदेखील बजाविण्यात आल्या होत्या. कारवाई करून देखील ते पाडण्यात आली. परंतु अशा बांधकाम करणाऱ्यांना आळा बसला नाही. अनधिकृत बांधकामे शोधण्यासाठी सॅटेलाइटची मदत घेणार असल्याने कुठे बांधकाम सुरू आहे, याची माहिती एका क्‍लिकवर प्राधिकरणाच्या कार्यालयातच समजणार आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×