UN Worker Dead : गाझातील स्फोटात संयुक्त राष्ट्र कर्मचारी ठार, तर ५ जण गंभीर जखमी

देर अल-बलाह (गाझा पट्टा) – गाजा पट्ट्यातल्या संयुक्त राष्ट्राच्या अतिथीगृहावर आज झालेल्या बॉम्बहल्ल्यात संयुक्त राष्ट्राचा एक कर्मचारी ठार झाला, तर इतर ५ जण जखमी झाले. मात्र देर अल-बलाह शहराच्या मध्यवस्तीमध्ये हा बॉम्बहल्ला कोणी केला, हे सांगण्यास प्रकल्प सेवांसाठी यूएन कार्यालयाचे प्रमुख जॉर्ज मोरेरा दा सिल्वा यांनी नकार दिला.
हा बॉम्ब फेकण्यात आला असावा किंवा टाकण्यात आला असावा असा अंदाज त्यांनी वर्तवला. हा स्फोट एखाद्या अपघाताने झाला असल्याची शक्यता त्यांनी फेटाळून लावली.
स्फोटात मृत आणि जखमी झालेल्या व्यक्ती कोणत्या देशाचे होते हे त्यांनी सांगितले नाही. यूएनपीओएस ही संयुक्त राष्ट्रसंघाची संस्था जगभरात पायाभूत सुविधा आणि विकास प्रकल्प चालवते. या संस्थेच्या आवारात हा स्फोट झाला.
इस्रायलच्या सैन्याने मंगळवारी गाझातील अनेक शहरांवर मोठे हवाई हल्ले केले. त्यामध्ये ४०० पेक्षा जास्त पॅलेस्टिनी ठार झाले. मात्र संयुक्त राष्ट्राच्या संस्थेवर बॉम्ब हल्ला केल्याचा आरोप इस्रायली सैन्याने फेटाळून लावला आहे.
परंतू सोमवारी कंपाऊंडजवळ हल्ले झाले. मंगळवारी आणि पुन्हा बुधवारी थेट संस्थेवर हल्ला झाला. इस्रायलने या संस्थेवर हल्ल्याचा आरोप नाकारला आहे. की संयुक्त राष्ट्रांचा परिसर आहे. लोक तिथे राहतात आणि काम करतात,हे इस्रायलला माहितअसल्याचे मोरेरा दा सिल्वा म्हणाले.





