Maharashtra Rain Alert : राज्यात वादळी पावसाचा इशारा; ‘या’ जिल्ह्यात पुढील २ दिवस गारपीट; कोकणात येलो अलर्ट
Maharashtra Rain Alert : अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस आणि गारपीट होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हवामान तज्ज्ञ एस. डी. सानप यांनी याबाबत माहिती दिली.

Maharashtra Rain Alert : महाराष्ट्र राज्यात पुढील दोन दिवस हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता असून अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस आणि गारपीट होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हवामान तज्ज्ञ एस. डी. सानप यांनी याबाबत माहिती दिली.
गेल्या काही दिवसांत राज्यातील अनेक भागांमध्ये तापमान ४० अंशांच्या पुढे गेले होते. पुणे शहरातील लोहगाव येथे काल ३९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. सध्या दमट वातावरणामुळे उष्णतेची तीव्रता जाणवत असली तरी पावसामुळे पुढील काही दिवसांत तापमानात घट होण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील दोन दिवसांत सोलापूर, सांगली, सातारा, पुणे, लातूर, संभाजीनगर, धाराशिव, नागपूर आणि अमरावती या जिल्ह्यांत वादळी पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. तर कोकण विभागासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. ३० मार्चनंतर राज्यातील अनेक भागांत पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. Maharashtra Rain Alert

Maharashtra Rain Alert
दरम्यान, शेतकऱ्यांना हवामान विभागाने महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. पिकांची काढणी लवकरात लवकर पूर्ण करावी, काढलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवावीत आणि फळबागांची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. वादळी वाऱ्यामुळे होणाऱ्या संभाव्य नुकसानीपासून बचाव करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.





