#HathrasRapeCase : उमा भारतीने केली योगींना विंनती

नवी दिल्ली – काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केली आहे. राहुल गांधी यांना कलम 188 अंतर्गत अटक करण्यात आली आहे. त्याअगोदर हाथरसला पायी चालत जाणाऱ्या काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांकडून धक्काबुक्की करण्यात आली. त्यानंतर या घटनेवर राज्यात तीव्र पडसाद उमटत आहेत तसेच अनेक नेत्यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
२)आज मेरा 7 वा दिन है और इसलिये मै अयोध्या मामले पर विशेष सीबीआइ कोर्ट में पेश भी नही हो पायी । यद्यपि मै किसी से मिल नही सकती , फ़ोन नही कर सकती लेकिन टीवी है जिससे की समाचार मिलते है ।
— Uma Bharti (@umasribharti) October 2, 2020
या संपूर्ण घटनेवरून देशात योगी सरकारवर देशातून शंका निर्माण होत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपच्या वरिष्ठ नेत्या उमा भारती यांनी ट्विट करत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना महत्वपूर्ण सल्ला दिला आहे.
काय म्हणाल्या उमा भारती
‘योगीजी माध्यमांना राजकीय नेत्यांना हाथरस घटनेतील पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेऊ द्यावी, मी भाजपमध्ये आपली मोठी बहीण आहे, माझ्या विनंतीला नकार देऊ नका, असेही भारतींनी म्हटले आहे. ‘





