Rahul Gandhi: ‘राजीव गांधींची सुरक्षा काढण्यामागे नेमकं काय होतं?’ ; राहुल गांधींनी आई, बहिणीसोबतचा शेअर केला व्हिडीओ
Rahul Gandhi: काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी त्यांच्या आई सोनिया गांधी आणि बहीण प्रियांका गांधी यांच्यासोबतच्या संभाषणाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

Rahul Gandhi: काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी त्यांच्या आई सोनिया गांधी आणि बहीण प्रियांका गांधी यांच्यासोबतच्या संभाषणाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.
या संभाषणात गांधी कुटुंबाच्या अनेक गोड आठवणी, राजकीय चढ-उतार आणि सोनिया गांधींच्या वैयक्तिक संघर्षांचा उल्लेख आहे. राहुल गांधींनी त्यांच्या बालपणीच्या आठवणी, वडील राजीव गांधी यांची सुरक्षा काढून घेण्याचा निर्णय आणि २००४ मध्ये घेतलेल्या निर्णयाची आठवणही सांगितली.
इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडिओ शेअर करताना राहुल गांधींनी लिहिले, “लग्नाचा प्रस्ताव ठरल्याप्रमाणे झाला नाही, ना माझा सातवा वाढदिवस.
The proposal didn’t go according to plan and neither did my seventh birthday.
The decision in 2004 gave some of us relief but others joy.
There was an intention behind withdrawing Papa’s security.
And even after 500+ pages there are some things Ma has left out of her book.
Priyanka and I sat down with our mother to talk through all of it. Going back to those memories brought back the joy, the laughter and even the pain we felt at the time.
Ma’s journey of Belonging has been full of enormous love and terrible tragedy, and she has met all of it with dignity and courage.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) November 24, 2026
२००४ च्या निर्णयामुळे आमच्यापैकी काहींना दिलासा मिळाला, तर काहींना आनंद झाला. बाबांची सुरक्षा काढून घेण्यामागे एक उद्देश होता. ५०० हून अधिक पानांचे पुस्तक असूनही, त्यात काही गोष्टी अशा आहेत ज्यांचा आईने समावेश केलेला नाही.”
राहुल गांधी पुढे लिहितात, “मी आणि प्रियांका आमच्या आईसोबत बसून या सर्व गोष्टींवर चर्चा केली. त्या जुन्या आठवणींना उजाळा देताना, त्यावेळी अनुभवलेला आनंद, हास्य आणि वेदनाही पुन्हा जागृत झाल्या.” आपल्या आईच्या ‘बिलॉन्गिंग’ या पुस्तकाचा संदर्भ देत राहुल गांधी म्हणाले की, त्यांच्या आईचे आयुष्य अथांग प्रेम आणि अत्यंत दुःखद घटनांनी भरलेले होते. त्यांनी या सर्व परिस्थितींचा सन्मानाने आणि धैर्याने सामना केला.
दुःखद आठवणी जाग्या झाल्या Rahul Gandhi:
राहुल गांधींनी पुढे लिहिले की, प्रियांका आणि मी माझ्या आईसोबत बसलो आणि या सगळ्याबद्दल बोललो. त्या आठवणी, ते आनंद, ते हसू आणि त्यावेळच्या वाटलेल्या वेदना – सगळं पुन्हा ताजं झालं. ‘स्वत:च्या’ शोधात आईचा प्रवास खूप प्रेम आणि भयंकर शोकांतिकांनी भरलेला आहे आणि तिने या सर्व गोष्टींना पूर्ण सन्मानाने आणि धैर्याने तोंड दिले आहे.
सोनिया गांधी यांनीही शेअर केले Rahul Gandhi:
राहुल गांधींचा व्हिडिओ शेअर करताना सोनिया गांधींनी लिहिले की, मी माझ्या आठवणींच्या आधारे ‘बेलाँगिंग’ लिहिले आहे. राहुल आणि प्रियांका यांनी त्यांच्या आठवणी जोडल्या, ज्यामुळे या कथांमध्ये नवीन जीवन आले. माझी मुलं म्हणजे माझा सर्वात मोठा आनंद आणि माझी ताकद आहे. ते दोन लोक आहेत जे माझ्या संयमाची इतर कोणापेक्षा जास्त परीक्षा घेतात.





