किव्ह – युक्रेनचे अध्यक्ष वोलोदायमिर झेलेन्सकी यांनी शांततेच्या प्रस्तावाच्या मुद्यावरून अमेरिकेतील अब्जाधीश उद्योगपती इलॉन मस्क यांची चांगलीच खरडपट्टी काढली आहे. उलट मस्क यांनी युक्रेनला भेट द्यावी, असे निमंत्रणच झेलेन्सकी यांनी मस्क यांना दिले आहे.
रशिया आणि युक्रेन दरम्यान सुरू असलेल्या संघर्षाबाबत मस्क यांनी ऑक्टोबर महिन्यात एक शांततता प्रस्ताव दिला होता. ट्विटरवरुन दिलेल्या या प्रस्तावामध्ये मस्क यांनी एक प्रस्ताव सुचवला होता. रशियाने युक्रेनचा जो भूभाग बळकावला आहे, तेथे संयुक्त राष्ट्राच्या देखरेखीखाली एक सार्वमत घेण्यात यावे, असे मस्क यांनी सुचवले होते.
एवढेच नव्हे तर क्रिमिया द्विपसमूहावर रशियाचा सार्वभौम अधिकार आहे आणि युक्रेन तटस्थ असल्याचेही मस्क यांनी म्हटले होते. मस्क यांनी मांडलेल्या या मतांवर झेलेन्सकी यांनी जोरदार आक्षेप देखील घेतला होता. न्यूयॉर्कमधील एका कार्यक्रमात दूरदृश्य माध्यमातून सहभागी होताना झेलेन्सकी यांनी मस्क यांनी अगोदर युक्रेनला यावे, असे सुनावले.
जर आपला प्रभाव आहे, असे वाटत असेल किंवा स्वतः निष्कर्श काढू शकत आहे, असे वाटत असल्यास युक्रेनला भेट द्यावी. म्हणजे रशियाने काय केले आहे, ते समजेल. त्यानंतरच हे युद्ध कोणी सुरू केले आणि ते कसे संपवायचे हे मला सांगावे. असे झेलेन्सकी म्हणाले.
पंतप्रधान मोदींचा त्यांच्याच पक्षाकडून अपमान; मुख्यमंत्री बघेल यांनी ‘ते’ पोस्टर शेअर करत केला दावा
आपल्या प्रस्तावासंदर्भात मस्क यांनी ट्विटरवर एक मतदान घेतले होते. त्यावरही झेलेन्सकी संतापले होते. “युक्रेनला कोणाचा पाठिंबा आहे आणि रशियाला कोणाचा पाठिंबा आहे, या मुद्यांवर मतदान घ्यायला पाहिजे होते. असे झेलेन्सकी म्हणाले होते.