“भारत प्रामुख्याने आमच्यासोबतच…” ; रशिया-युक्रेन संघर्षादरम्यान झेलेन्स्की यांचे धक्कादायक विधान

Ukraine Russia War। रशिया-युक्रेन युद्धादरम्यान, भारत या संघर्षाला खतपाणी घालत आहे का, असे प्रश्न अनेकदा उपस्थित केले करण्यात आले होते. यावरच युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी यावर स्पष्टपणे उत्तर दिले. त्यांनी सांगितले की,”भारत प्रामुख्याने युक्रेनच्या बाजूने आहे आणि कोणत्याही प्रकारे संघर्षाला प्रोत्साहन देत नाही.” असे धक्कादायक विधान त्यांनी केले आहे.
झेलेन्स्की यांनी ऊर्जा क्षेत्रात काही समस्या आहेत, परंतु त्या सोडवता येतात हे सांगत,”आपल्याकडे ऊर्जेशी संबंधित समस्या आहेत, परंतु त्या सोडवता येतात. भारत आपल्यासोबत उभा आहे आणि युरोपनेही भारतासोबत मजबूत संबंध निर्माण करावेत.”असे म्हटले.
झेलेन्स्की यांनी युरोपीय देशांना हे आवाहन Ukraine Russia War।
त्यांनी युरोपीय देशांना भारतासोबत सहकार्य आणि संबंध अधिक मजबूत करण्याचे आवाहन केले. झेलेन्स्की म्हणाले की, “आपण भारतीय मित्र राष्ट्रांपासून दूर राहू नये, कारण ते या संघर्षात युक्रेनसोबत उभे आहेत. त्यांचे विधान अशा वेळी आले आहे जेव्हा रशिया आणि युक्रेनमधील युद्ध सुरू आहे आणि त्याचे परिणाम जागतिक स्तरावर जाणवत आहेत.
युक्रेनच्या राष्ट्रपतींनी हे संकेत
युक्रेनच्या राष्ट्रपतींनी असेही संकेत दिले की,भारतासोबत चांगले संबंध राखणे दोन्ही बाजूंसाठी फायदेशीर ठरेल. त्यांनी सांगितले की आंतरराष्ट्रीय सहकार्य, विशेषतः युरोप आणि भारत यांच्यातील भागीदारी, ऊर्जा संकट आणि युद्धाशी संबंधित आव्हानांना तोंड देण्यास मदत करू शकते.
रशिया-युक्रेन युद्ध २०२२ मध्ये सुरू Ukraine Russia War।
रशिया-युक्रेन युद्ध २०२२ मध्ये रशियाने युक्रेनवर आक्रमण केले तेव्हा सुरू झाले. त्यात अनेक लोक जखमी आणि मारले गेले. युरोप आणि अमेरिकेने रशियावर आर्थिक आणि ऊर्जा निर्बंध लादले. युक्रेनने आंतरराष्ट्रीय मदतीने स्वतःचा बचाव केला आणि रशिया व्यापलेल्या प्रदेशांवर नियंत्रण राखण्याचा प्रयत्न करत आहे. या युद्धाचा जगाच्या ऊर्जा, अन्न आणि अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे.





