Ukraine Russia War : युक्रेनचं सैन्यबळ वाढणार, लढण्यासाठी कैद्यांची सुटका करणार झेलेन्स्की
Updated On:

कीव – सलग पाच दिवस युक्रेन रशियासोबत युद्ध करत आहे. रशियाच्या तुलनेत युक्रेनची सैनिकांची संख्या अनेक पटीने कमी आहे. तसेच इतर देशांकडूनही सैन मिळत नसल्याने आता युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी रशियाविरोधात लढण्यास इच्छुक असलेल्या कैद्यांना तुरुंगातून मुक्त करण्याची घोषणा केली आहे. रॉयटर्सने याबाबत वृत्त दिले आहे.
युक्रेनच्या तुरुंगात असलेल्या ज्या कैद्यांना लष्करी कारवायांचा अनुभव आहे, असे कैदी रशियाविरोधात लढण्यास इच्छुक असल्यास त्यांची तुरुंगातून सुटका करण्यात येईल, असं झेलेन्स्की यांनी आपल्या निवदेनात म्हटले आहे. तसेच “आपला जीव वाचवा आणि युक्रेनमधून माघारी फिरा” असे आवाहन झेलेन्स्की यांनी रशियाच्या सैनिकांना केले आहे.





