उद्धव ठाकरेंची साथ सोडणार? नाराजीच्या चर्चांवर राजन साळवींनी स्पष्ट केली भूमिका…

Rajan Salvi | कोकणाताली राजापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि ठाकरे गटाचे प्रमुख नेते राजन साळवी हे उद्धव ठाकरेंची साथ सोडणार असल्याची चर्चा सुरु आहे. तीनवेळा आमदार राहिलेले राजन साळवी २०२४ च्या विधानसभ निवडणुकीत पराभूत झाले. किरण सामंत यांनी त्यांचा पराभव केला.
यानंतर राजन साळवी आता शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षावर नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे ते शिंदे गट किंवा भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू होती. अखेर पत्रकार परिषदेमध्ये राजन साळवी यांनी या सर्व चर्चांवर भाष्य करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
राजन साळवी नेमकं काय म्हणाले ?
राजन साळवी यांनी सांगितले की, “2024 च्या पराभावाला आम्ही सामोरे गेलो आहोत. याच्या वेदना, खंत माझ्यासह माझ्या मतदारसंघातील सामान्य जनतेला आहे आहेत. मला तुमच्याकडून कळतंय मी नाराज आहे. या सर्व अफवा आहेत. मी बाळासाहेब ठाकरे यांचा निष्ठावंत शिवसैनिक आहे. पिकल्या आंब्यावर कुणी तरी दगड मारत. तसा प्रयत्न भाजपाकडून केला गेला असेल. पण माझ्याशी कोणीही संपर्क झालेला नाही. मी मतदारसंघात कामं करत आहे. माझ्या पदाधिकाऱ्यांशी बोलेन. हा निष्ठावंत सैनिक बाळासाहेबांचाच राहणार. यात कोणतीही शंका नाही,” असे सांगत राजन साळवी यांनी चर्चांना पूर्णविराम दिला. Rajan Salvi |
“एसीबीच्या चौकशीचा निर्णय न्यायालयातून येणार आहे. त्यात आमच्यावर एसीबीची टांगती तलवार आहे. पराभवला कोण कारणीभूत आहे याचा शोध घेतला पाहिजे. समोरच्याला कोणी मदत केली याचा शोध घेतला पाहिजे. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे”, असे मत राजन साळवी यांनी व्यक्त केले. Rajan Salvi |
पराभवानंतर पक्षश्रेष्ठीने संपर्क साधला नसल्याने राजन साळवी नाराज असल्याची चर्चा होती. या चर्चेवर राजन साळवी म्हणाले, “पराभवानंतर मुंबईतील मातोश्री येथे पराभूत उमेदवारांची बैठक घेतली होती. तिथे पराभवाचं कारण आणि आत्मचिंतन करण्यात आलं. तेच आमच्यादृष्टीने महत्त्वाचं आहे.”
दरम्यान, राजन साळवी यांनी ठाकरे गटाची साथ सोडली तर कोकणात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठं खिंडार पडण्याची शक्यता आहे. पण आता राजन साळवी यांनी उद्धव ठाकरेंचा पक्ष सोडून कुठेही जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. Rajan Salvi |
हेही वाचा:





