VIDEO : राणेंवरील कारवाईनंतर उद्धव ठाकरेंचा व्हिडीओ व्हायरल; केलं होतं योगींना चपलेने मारण्याचं वक्तव्य..

Updated On:

मुंबई ( Uddhav Thackeray on Yogi ) – केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मुख्यमंत्र्यांवरील आक्षेपार्ह वक्तव्याचे संतप्त पडसाद मंगळवारी संपूर्ण महाराष्ट्रात उमटले. याप्रकरणी राणे यांच्यावर कारवाई करत त्यांना अटक देखील करण्यात आले होते. मात्र रात्री उशिरा महाड येथील न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. या संपूर्ण प्रकरणावर भाष्य करण्यासाठी राणे यांनी बुधवारी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी त्यांनी, उद्धव ठाकरे यांची काही पूर्वीची वक्तव्य वाचून दाखवत त्यांच्यावर कारवाई का नाही? असा प्रश्न उपस्थित केला.

राणे यांनी पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे यांच्या प्रसाद लाड, योगी आदित्यनाथ व अमित शाह यांच्यावरील वक्तव्य वाचून दाखवली. २०१८ मध्ये उद्धव ठाकरे यांनी उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचा उल्लेख केला. अनेक भाजप नेत्यांनी देखील उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ समाज माध्यमांवर शेअर केला असून उत्तर प्रदेशाच्या मुख्यमंत्र्यांवर ठाकरे यांनी केलेली टीका योग्य आहे का? राणे यांच्या प्रमाणे ठाकरेंना देखील अटक करावी अशी मागणी भाजप नेत्यांनी केली आहे.

कारवाईनंतर राणेंकडून मुख्यमंत्र्यांचा ‘आदरार्थी’ उल्लेख; म्हणाले, यापुढे टीका करताना…

समाज माध्यमांवर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये उद्धव ठाकरे हे नेमकं काय म्हणाले होते? | Uddhav Thackeray on Yogi

पालघर येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी २६ मे २०१८ ला हे वक्तव्य केलं होत. यामध्ये ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर सडकून टीका करताना दिसतायेत. तसेच ‘योगी आदित्यनाथ यांना चपलेने मारायला हवं’ असं वक्तव्य देखील ठाकरे यांनी केल्याचं दिसतंय. ( Uddhav Thackeray on Yogi )

उद्धव ठाकरे या व्हीडीओमध्ये, “ते काल पर्वा काहीतरी योगी आदित्यनाथ आले होते. योगी म्हणे योगी. हा कसला योगी? हा तर भोगी. आणि योगी असेल तर मुख्यमंत्री कसा होऊ शकतो? योगी आहे म्हंटल्यावर त्याने सर्वकाही त्याग करून कुठेतरी गुहेत जाऊन बसायला पाहिजे. तू मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत जाऊन योगी म्हणवतोस? हा योगी असूच शकत नाही.आणि उत्तर प्रदेशमधून आल्यानंतर उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राचं नातं हे त्या योगीला पहिल्यांदा सांगायला पाहिजे.” असं वक्तव्य करताना दिसतायेत.

ते पुढे म्हणतात, “शिवरायांना राज्याभिषेक करायला गागाभट्ट आले होते उत्तर प्रदेशातून. त्यांनी किती सन्मानाने शिवरायांचा राज्याभिषेक केला. आणि हा योगी जो आला टरटरुण. गॅसचा फुगा असतो ना काही नसत गॅस असतो पण हवेत उडत असतो तसा हा गॅसचा फुगा. आला तो सरळ चपला घालून महाराजांना हार घालायला गेला. सरळ चपला घालून. असं वाटलं त्याच चपला घ्यावा अन् त्याच थोबाड फोडाव. लायकी तरी आहे तुझी महाराजांच्या पुतळ्यासमोर जाण्याची?”  

आणखी संबंधित बातम्या

Bachchu Kadu : बच्चू कडू शिंदेंच्या शिवसेनेत का गेले? 'ते' मोठे कारण आले समोर!

2026-05-23 15:46:46

Bachchu Kadu : बच्चू कडू शिंदेंच्या शिवसेनेत का गेले? 'ते' मोठे कारण आले समोर!

Maharashtra Politics : राजकारणात खळबळ! ठाकरेंचा खासदार उदय सामंतांच्या भेटीला; चर्चांना उधाण

2026-05-19 19:49:17

Maharashtra Politics : राजकारणात खळबळ! ठाकरेंचा खासदार उदय सामंतांच्या भेटीला; चर्चांना उधाण

Maharashtra politics : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंपाचे संकेत; ठाकरे गटाचे 6 खासदार फुटणार? शिंदे-आष्टीकर भेटीने खळबळ

2026-05-18 17:19:10

Maharashtra politics : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंपाचे संकेत; ठाकरे गटाचे 6 खासदार फुटणार? शिंदे-आष्टीकर भेटीने खळबळ

Uddhav Thackeray : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची ४ वर्षांत फक्त ३१ टक्के उपस्थिती; दोन सदस्यांची ३ अधिवेशनांना दांडी

2026-05-17 22:40:55

Uddhav Thackeray : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची ४ वर्षांत फक्त ३१ टक्के उपस्थिती; दोन सदस्यांची ३ अधिवेशनांना दांडी

Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंना बालेकिल्ल्यात मोठा धक्का! बड्या नेत्याने अनेक कार्यकर्त्यांसह सोडली साथ

2026-05-17 17:00:58

Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंना बालेकिल्ल्यात मोठा धक्का! बड्या नेत्याने अनेक कार्यकर्त्यांसह सोडली साथ