मुंबई – दादरच्या शिवाजी मंदिरात ठाकरे गटाच्या शाखाप्रमुखांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. पाटण्यातील विरोधकांची बैठक ही कुटुंब बचाओ मोहीम होती, अशी टीका काल देवेंद्र फडवणीस यांनी केली होती. त्याला आज उद्धव ठाकरेंनी चांगल्याच शब्दांत उत्तर दिल असल्याचं दिसून आलं.
“देवेंद्रजी परिवार तुम्हालाही आहे. तुमच्याही परिवाराचे व्हॉट्सअप बाहेर आले आहेत. आम्ही त्यावर अजून बोललो नाही. आम्ही त्यावर बोललो तर तुम्हाला शवासन करावं लागेल. तुम्हाला कोणतीही आसनं झेपणार नाही. फक्त झोपावं लागेल, असा गर्भित इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.
तर, दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या याच इशाऱ्याला फडणवीसांनी ट्विटच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिल्याचं दिसून आलं आहे. “मी, माझे कुटुंब आणि माझा संपूर्ण भाजपा परिवार एक खुली किताब आहे उद्धव ठाकरे.! ज्या ‘व्हॉटसअॅप चॅट’ बाबत तुम्ही बोलताय, ते आरोपपत्राचे भाग आहेत.
न्यायालयाच्या रेकॉर्डवर आहेत आणि जाणीवपूर्वक टाकले आहेत, कारण, लपविण्यासारखे आमच्याकडे काहीच नाही. पण, मुख्यमंत्रीपदी राहिलेल्या माणसाला इतकी ‘बालबुद्धी’ असावी, याचे मात्र आश्चर्य वाटते. त्यामुळे त्याची फार चिंता तुम्ही करु नका..’ असं देवेंद्र फडणवीस म्हंटले आहेत.
राज्याचे लोकप्रिय नेते मा. @Dev_Fadnavis जी यांच्यावर टीका करताना उद्धव ठाकरेंनी नीचपणाचा कळस गाठला आहे. त्यांचे मणक्याचे दुखणे आता मेंदुपर्यंत पोहोचले आहे.
चांगले ‘उपचार’ करावे लागतील उद्धवजी ❗️
Get well Soon @OfficeofUT ❗️— Acharya Tushar Bhosale (@AcharyaBhosale) June 24, 2023
दरम्यान, आता प्रकरणावर भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी ट्विटच्या माध्यमातून भाष्य केलं आहे. तुषार भोसले आपल्या पोस्टमध्ये म्हणातात की, “राज्याचे लोकप्रिय नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना उद्धव ठाकरेंनी नीचपणाचा कळस गाठला आहे. त्यांचे मणक्याचे दुखणे आता मेंदुपर्यंत पोहोचले आहे. चांगले ‘उपचार’ करावे लागतील उद्धवजी..’ अश्या शब्दात त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.