Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंचा एकनिष्ठ खासदार सोडणार साथ? ‘त्या’ निकालावर गणित ठरणार असल्याची चर्चा
Uddhav Thackeray : मंत्रिपदाची ऑफर नाकारल्याचंही केलं होतं स्पष्ट

Uddhav Thackeray: शिंदेंच्या शिवसेनेकडून राबवल्या जाणाऱ्या ऑपरेशन टायगरची सध्या राज्यात चर्चा रंगली आहे. याद्वारे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत मोठी फुट पडण्याची शक्यता आहे.
ठाकरेंच्या पक्षातील १६ आमदार आणि ७ खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. इतकेच काय तर अंतिम बोलणी झाली आहे, फक्त पक्षप्रवेश तारीख निश्चित करायचे राहिले असा दावा शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाने यांनी केला आहे
दरम्यान, ठाकरे पक्षाची रविवारी खासदारांची मातोश्रीवर बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीत काही खासदार ऑनलाईन होते, तर काही खासदार मातोश्रीवर आले होते असा दावा खासदार संजय राऊत यांनी केला. त्यामध्ये, धाराशिव लोकसभा मतदारसंघातील खासदार ओमराजे निंबाळकर यांनीही ऑनलाईन हजेरी लावल्याचं सांगण्यात आलं.
विशेष म्हणजे, ज्यांनी ऑनलाईन हजेरी लावली त्यांना उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन खुलासा करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, ओमराजे निंबाळकर यांनी तसा कुठलाही प्रयत्न न केल्याने ओमराजे निंबाळकर हेही ठाकरेंची साथ सोडण्याच्या वाटेवर असल्याचं दिसून येत आहे.
ठाकरेंच्या बैठकीला अनुपस्थिती
ओमराजेंनी गेल्या अनेक वर्षांपासून ते उद्धव ठाकरेंचे एकनिष्ठ म्हणून ओळखले जातात. मात्र, ठाकरेंनी बोलवलेल्या गेल्या दोन बैठकांना ओमराजेंची अनुपस्थितीत होती, त्यांनी ऑनलाईनच हजेरी लावली होती. तर कालच्याही बैठकीला ओमराजेंनी कौटुंबिक कारण देत उपस्थित राहिले नाहीत.
विशेष म्हणजे दोन दिवसांत त्यांच्या वडिलांच्या हत्या प्रकरणाचा निकाल लागणार आहे. त्यामुळे, हा निकाल नेमका कोणाच्या बाजुने लागतो, काय लागतो यावरही त्यांच्या प्रवेशाची गणितं अवलंबून असू शकतात.
दरम्यान, याआधी देखील अनेकदा ओमराजे निंबाळकर ठाकरेंची साथ सोडणार अशा चर्चा झाल्या आहेत. परंतु ठाकरेंची साथ कधीही सोडणार नाही, आपण मंत्रिपदाची ऑफर नाकारल्याचंही ते सांगत होते. मात्र, आता त्यांच्या पक्षप्रवेशाची पुन्हा चर्चा होत असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
ऑपरेशन टायगरमध्ये कोणाची नावे चर्चेत?
ऑपरेशन टायगरमध्ये परभणीचे खासदार बंडू जाधव, यवतमाळचे संजय देशमुख, भाऊसाहेब वाकचौरे, संजय दिना पाटील, हिंगोलीचे नागेश पाटील आष्टीकर आणि ओमराजे निंबाळकर यांचंही नाव या यादीत घेतलं जात आहे. विशेष म्हणजे, कालच्या मातोश्रीवरील खासदारांच्या बैठकीला ओमराजे निंबाळकर गैरहजर होते. त्यामुळे शिंदेसेनेसोबत जाण्याबाबत त्यांच्या नावाची जोरदार चर्चा होत आहे.
हेही वाचा:
Murlidhar Mohol: देशात महागाईचा दर कमी झालाय; केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा मोठा दावा






