Murlidhar Mohol: देशात महागाईचा दर कमी झालाय; केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा मोठा दावा
Murlidhar Mohol: पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या तपपूर्तीनिमित्त पुणे शहर भाजपतर्फे पत्रकार परिषदेचे आयोजन; केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची प्रमुख उपस्थिती.

Murlidhar Mohol – महागाईचा दर कमी झाल्याचा दावा केंद्रीय नागरी विमानसेवा आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या तपपूर्तीनिमित्त पुणे शहर भाजपतर्फे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शत्रुघ्न नाना काटे, पुणे जिल्हा ग्रामीण उत्तरचे अध्यक्ष प्रदीप कंद आणि दक्षिणचे अध्यक्ष शेखर वढणे आदी उपस्थित होते.
सन २०१४ मध्ये देशातील जनतेने भाजप आणि एनडीए आघाडीवर विश्वास ठेवून स्पष्ट बहुमताची सत्ता दिली. ‘सबका साथ, सबका विकास’ या महामंत्रामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग १२ वर्षे देशाच्या सर्वोच्च पदावर कार्यरत राहिले. १० जून २०२६ रोजी सलग ४,९९३ दिवस पंतप्रधानपदावर राहण्याचा ऐतिहासिक विक्रम मोदी यांनी केवळ जनतेच्या अतूट विश्वासाच्या बळावर केला आहे.
मागील १२ वर्षांत सरकारने केलेली अभूतपूर्व विकासकामे घेऊनच आम्ही आगामी काळात जनतेमध्ये जात आहोत, असे मोहोळ म्हणाले. भाजप सरकारने १२ वर्षांत अनेक सकारात्मक गोष्टी केल्या असतील, तर काॅक्रोज पार्टी कशी उदयाला आली, या प्रश्नावर काॅक्रोज पार्टीला फार गांभीर्याने घ्यायची गरज नाही, असे उत्तर मोहोळ यांनी दिले.





