उद्धव ठाकरेंचे एक पाऊल पुढे; राज ठाकरेंच्या ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी जाणार? मुहूर्त ठरला

Uddhav Thackeray And Raj Thackeray | शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त स्वतः मनसे प्रमुख राज ठाकरे मातोश्रीवर गेले होते. यावेळी दोघांनी गळाभेट घेतली. तसेच राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना पुष्पगुच्छ भेट देत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. यानंतर आता गणेशोत्सवात उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंच्या ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.
विशेष म्हणजे राज ठाकरे यांच्या नवीन निवासस्थानी उद्धव ठाकरे यांची ही पहिलीच भेट असणार आहे. वरळीतील विजयी मेळाव्यात दोन्ही भाऊ एकाच स्टेजवर होते. त्यानंतर उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे मातोश्रीवर पोहचले होते. आता उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या घरी जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. Uddhav Thackeray And Raj Thackeray |
दरम्यान, राज ठाकरे यांच्या घरी दीड दिवसांचा बाप्पा असून दरवर्षी अनेक राजकीय नेते बाप्पाच्या दर्शनाला येत असतात. यावेळी उद्धव ठाकरे देखील बाप्पाच्या दर्शनाला येणार असल्याचे म्हंटले जात आहे.
तर दुसरीकडे, आगामी पालिका निवडणुकीसाठी हे दोघेही ठाकरे बंधू एकत्र येतील, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. Uddhav Thackeray And Raj Thackeray |
हेही वाचा :




