Maharashtra Politics : अर्थ खाते पुन्हा राष्ट्रवादीकडे द्यावे; अजित पवार गटाच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतली अमित शहांची भेट
Maharashtra Politics : महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना पुन्हा वेग आला असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहा वरिष्ठ नेत्यांनी सोमवारी नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली.

Maharashtra Politics : महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना पुन्हा वेग आला असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहा वरिष्ठ नेत्यांनी सोमवारी नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. (Maharashtra Politics)
या बैठकीत महाराष्ट्रातील दुष्काळ, सरकारमधील खातेवाटप आणि विशेषतः अर्थ मंत्रालय पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडे सोपविण्याच्या मागणीवर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. (Maharashtra Politics)
अमित शहा यांची भेट घेणाऱ्या शिष्टमंडळात धनंजय मुंडे, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ आणि दिलीप वळसे-पाटील यांचा समावेश होता. सुमारे तासभर चाललेल्या बैठकीत महायुती सरकारमधील समन्वय, आगामी राजकीय रणनीती आणि खातेवाटपाबाबत सविस्तर चर्चा झाल्याचे सांगितले जाते. (Maharashtra Politics)
सूत्रांच्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी अर्थ मंत्रालय पुन्हा आपल्या पक्षाकडे देण्याची भूमिका मांडली. राज्याच्या आर्थिक धोरणांमध्ये प्रभावी सहभाग राहावा आणि विकासकामांच्या अंमलबजावणीला गती मिळावी, यासाठी अर्थ खाते राष्ट्रवादीकडे असणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी बैठकीत व्यक्त केल्याचे समजते. (Maharashtra Politics)
मात्र, याबाबत कोणताही अधिकृत निर्णय झालेला नसून अंतिम निर्णय भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून घेतला जाणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. दरम्यान, महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातील राजकीय समीकरणांवर नव्याने चर्चा सुरू झाली आहे. (Maharashtra Politics)
या निवडणुकीत महाविकास आघाडीने तीन जागांवर विजय मिळवला, तर महायुतीला एका जागेवर समाधान मानावे लागले. या पार्श्वभूमीवर महायुतीतील समन्वय, खातेवाटप आणि आगामी राजकीय रणनीती यावर चर्चा करण्यासाठी दिल्लीतील बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. मात्र, अर्थ खाते राष्ट्रवादी काँग्रेसकडे परत जाणार का, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. (Maharashtra Politics)





