Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; भूमीपूजन केलेला २५ कोटींचा प्रकल्प भाजपकडून रद्द
Maharashtra Politics : गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांच्या स्मृती जपण्यासाठी मीरा-भाईंदरमध्ये उभारण्यात येत असलेल्या महत्त्वाकांक्षी संगीत गुरुकुलावरून महायुतीमध्ये मोठा राजकीय वाद पेटला आहे.

Maharashtra Politics : भारतरत्न लता मंगेशकर यांच्या स्मृती जपण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या संगीत विद्यालयावरून मीरा-भाईंदरच्या राजकारणात मोठा वाद निर्माण झाला आहे. तब्बल २५ कोटी रुपये खर्च करून उभारण्यात येणाऱ्या आणि ७० टक्के बांधकाम पूर्ण झालेल्या संगीत गुरुकुलाचे रूपांतर आता महापौरांच्या निवासस्थानात करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. (Maharashtra Politics)
विशेष म्हणजे, या प्रकल्पाचे भूमिपूजन तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले होते. आता सत्ताधारी भाजपच्या या निर्णयावर विरोधकांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. (Maharashtra Politics)
शहरात आधीच महापौर निवास असताना दुसऱ्या निवासस्थानाची गरज काय? असा संतप्त सवाल मंत्री प्रताप सरनाईक यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे मीरा-भाईंदरच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटले आहे. (Maharashtra Politics)
२५ कोटींच्या संगीत गुरुकुलाचा महापौर निवासासाठी वापर?
भारतरत्न लता मंगेशकर यांच्या स्मृती जतन करण्यासाठी मीरा-रोड येथे लता मंगेशकर संगीत गुरुकुल उभारण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला होता. या प्रकल्पासाठी सुमारे २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, संगीत विद्यालयाच्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. (Maharashtra Politics)
मिळालेल्या माहितीनुसार, या इमारतीचे जवळपास ७० टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे. मात्र, आता या इमारतीचा वापर संगीत विद्यालयाऐवजी महापौरांच्या निवासस्थानासाठी करण्याचा प्रस्ताव पुढे आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. (Maharashtra Politics)
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत या इमारतीचे महापौर निवासस्थानात रूपांतर करण्यासंदर्भातील ठराव मांडण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे संगीत गुरुकुलाचा मूळ उद्देशच बदलला जाणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. (Maharashtra Politics)
दुसरे महापौर निवास कशासाठी? प्रताप सरनाईकांचा संतप्त सवाल
या निर्णयाची माहिती मिळताच मंत्री प्रताप सरनाईक यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. भारतरत्न लता मंगेशकर यांच्या नावाने उभारण्यात येणारा संगीत विद्यालयाचा प्रकल्प मागे घेऊन त्या ठिकाणी महापौर निवास उभारण्याचा निर्णय संतापजनक असल्याचे त्यांनी म्हटले. (Maharashtra Politics)
शहरात आधीच महापौर निवासस्थान असताना दुसरे निवासस्थान उभारण्याची गरज काय? असा सवालही सरनाईक यांनी उपस्थित केला आहे. (Maharashtra Politics)
लता मंगेशकर यांच्या स्मृती जपण्यासाठी आणि संगीत क्षेत्रातील विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी हा प्रकल्प उभारण्यात येत होता. अशा परिस्थितीत बांधकाम जवळपास पूर्ण झालेले असताना त्याचा मूळ उद्देश बदलण्याचा निर्णय योग्य आहे का, असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित होत आहे. (Maharashtra Politics)
एकनाथ शिंदेंच्या हस्ते झाले होते भूमिपूजन
या संगीत गुरुकुल प्रकल्पाचे भूमिपूजन सुमारे तीन वर्षांपूर्वी २७ सप्टेंबर रोजी तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले होते. (Maharashtra Politics)
या कार्यक्रमाला ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांच्यासह मंगेशकर कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. या प्रकल्पासाठी सुमारे २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. (Maharashtra Politics)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात या प्रकल्पासाठी पाच कोटी रुपयांची प्राथमिक तरतूद मंजूर करण्यात आल्याची माहितीही समोर आली आहे. आता या प्रकल्पाचे ७० टक्के काम पूर्ण झाल्याचे सांगितले जात असताना, इमारतीचा वापर महापौर निवासासाठी करण्याचा प्रस्ताव पुढे आल्याने राजकीय वाद निर्माण झाला आहे. (Maharashtra Politics)
भाजपच्या निर्णयावर विरोधकांची टीका; पुढे काय होणार?
लता मंगेशकर संगीत गुरुकुलाच्या जागेवर महापौर निवास उभारण्याच्या प्रस्तावामुळे मीरा-भाईंदरच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. एका बाजूला संगीत विद्यालयाच्या माध्यमातून संगीत क्षेत्रातील विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून देण्याचा उद्देश होता, तर दुसऱ्या बाजूला महापौर निवासस्थानासाठी इमारतीचा वापर करण्याचा प्रस्ताव समोर आल्याने या निर्णयाच्या गरजेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. (Maharashtra Politics)
विशेष म्हणजे, या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च झाला असून, बांधकामही अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे हा प्रकल्प रद्द करून महापौर निवासस्थान उभारण्याचा निर्णय झाल्यास त्याचा आर्थिक आणि सांस्कृतिक परिणाम काय होणार, याकडेही लक्ष लागले आहे. (Maharashtra Politics)





